कोरोनाच्या सोबतीला मलेरिया, टायफॉइड सारख्या लक्षणामुळे वैद्यकीय विभाग बेजार तर नागरिक हैराण?
कल्याण (संजय कांबळे) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस आकडेवारी बदलत असताना आता याच्या सोबतीला मलेरिया आणि टायफॉइड हे येऊ पाहत असून एकसारखे लक्षणे दिसू लागली असल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी बैजार झाले आहेत तर आपल्याला कोरोना आहे की काय या भितीने नागरिक पुरते हैराण झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वच विभागातील छोटे मोठे अधिकारी व कर्मचारी यांचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने सगळ्यांचीच बोलती बंद झाली आहे. केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर तालुक्यातील एकूण ४६ ग्रामपंचायती पैकी तब्बल १० ग्रामपंचायती आणि १९ गावे कोरोना पासून दूर राहिली होती या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंचांनी गावात कोरोनाचा एकही पाॅझिटिव रुण्ग नाही हे दर्शवणारे "हिरवे" निशान कार्यालयावर लावले होते. पण आता ते उतरवायची वेळ आली आहे. कारण प्रत्येक गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कालपर्यंत कल्याण ग्रामीण भागात ७९० पाॅझिटिव रुण्ग झाले आहेत. मयतांचा आकडा ९०वर पोहचला आहे. अॅक्टिव रुग्णाची संख्या २६६वर गेली आहे. तर कंन्टेनमेंट झोन ८०झाले आहेत. यांना वेळेवर उपचार मिळत नसताना आता कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने "माझे कुंटूब माझी जबाबदारी" ही कल्पना आणली आहे. यामध्ये घरोघरी जाऊन कोरोनोच्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. याकरिता कल्याण तालुक्यात दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५हजार ९६९ घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी ३९ पथके तयार करण्यात आली आहेत. खडवली ३हजार १८८ घरे २५ पथके तर निळजे २हजार ६२५ घरे ९०पथके च्या माध्यमातून कोरोनोच्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत सर्दी खोकला व ताप अशी लक्षणे असणारी व्यक्ती या दहागाव केंद्रांतर्गत ५७, खडवली १८ आणि निळजे १३ असे एकूण ८८ व्यक्ती आढळून आले आहेत. कोरोनाची लक्षणांचा विचार केला तर सर्दी, ताप, खोकला श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होणे असा आहे. अशीच लक्षणे मलेरिया व टायफॉइड या साथीच्या आजाराची आहेत.
सर्वच यंत्रणा ही कोरोना कोव्हीड च्या मागे लागल्याने गावा गावात सापसफाई झालेली नाही, कच-याचे ढिग साचले आहे. गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यावर खड्यांत साचते आहे. धुर फवारणी न झाल्याने सर्वच ठिकाणी मच्छरांची पैदास झाली आहे. त्यातच ऊन व पाऊस यामुळे व्हायरल फिवर वाढत आहेत. सर्दी, ताप आणि खोकला चे पेंशंट प्राथमिक आरोग्य केंद्र व गोवेली ग्रामीण रुग्णालयात गर्दी करित आहेत. असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या सारख्या दिसणाऱ्या लक्षणामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठाच त्रास सहन करावा लागला तर आपल्याला कोरोना नाही केवळ थोडासा ताप खोकला झाला आहे असे पटवून देताना नागरिकांचा श्वास कोंढण्याची वेळ आली आहे. अशातच तालुक्यात कोठेही कोरोना कोव्हीड सेंटर सुरू नसल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे कुंटूब प्रमुखांनी घरी राहून सुरक्षित राहून "माझे कुंटूब माझी जबाबदारी" ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून लक्षणे दिसू लागताच आरोग्य पथकांना सहकार्य करायला हवे!

No comments:
Post a Comment