Sunday, 4 October 2020

मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर आणि मंगेश सातपुते यांच्या हस्ते एस के फिल्म प्रोडक्शन निर्मित मराठी गाणी अल्बम चे उद्घाटन!

मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर आणि मंगेश सातपुते यांच्या हस्ते एस के फिल्म प्रोडक्शन निर्मित मराठी गाणी अल्बम चे उद्घाटन!


कल्याण (संजय कांबळे) : अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या जनाधार निर्भीड पत्रकार सेवा संस्था (रजि) संचलित एस के फिल्म प्रोडक्शन कल्याण - मुंबई यांनी निर्माण केलेल्या मराठी गाणी अल्बम चा उद्घाटन सोहळा मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या हस्ते आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुपरस्टार संजय दत्त यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून काम केलेले मंगेश सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरबाड तालुक्यातील साजई येथील कुसुमाई गार्डन येथे पार पडला.


यावेळी व्यासपीठावर ठाणे जिल्हा समाजकल्याण अधिकारी रमेश अवचार, जेष्ठ शिवव्याख्याते प्रा चंद्रशेखर पाटील, ऐरोली नवी मुंबई चे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रमेश पाटील, चित्रपट लेखक दिग्दर्शक एकनाथ देसले आणि एस के फिल्म प्रोडक्शन चे प्रमुख संजय कांबळे उपस्थित होते.
प्रथम जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या हस्ते नटराज पूजन व अभिनेते मंगेश सातपुते आणि इतर मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीलाच कोरोना कोव्हीड मध्ये जीव गमावलेल्या शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी सैनिक, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना टिम प्रमुख संजय कांबळे म्हणाले, गेली २०/२५ पत्रकारीता करित असताना अनेक सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींची भेट झाली. यामध्ये जेष्ठ एव्हरग्रीन अभिनेते कै निळू फुले, प्रंशात दामले, विजय पाटकर, कुशल बद्रिके, भूषण कडू, देवेन सरकार, प्रथमेश परब, लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर, लावणी क्विन विजया पालव, अलका कुबल, आदीचा समावेश असून यांच्या प्रेरणा घेऊन एक वर्षांपूर्वी एस के फिल्म प्रोडक्शन नावाची एक टिम तयार केली. यामध्ये कल्याण डोंबिवली, मुरबाड, शहापूर, नेरुळ, खोपोली ठाणे, नाशिक, पुणे सातारा येथील कलाकार व तंत्रज्ञ घेऊन ४मराठी सुपरहिट गाणी रेकॉर्डिंग करण्यात आली. ही गाणी महाराष्ट्राचा बुंलद आवाज आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांच्या शिंदेशाही घराण्यातील तरुण गायक समर्थक शिंदे व गायिका अपर्णा भगत यांनी गायिली आहेत तर शिवाजी पवार यांनी ती शब्दबद्ध केली आहेत. यांचे शुट महाराष्ट्रातील विविध भागात होणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या हस्ते एस के फिल्म प्रोडक्शन या फलकाचे अनावरण करण्यात आले तसेच कॅल्प देऊन  रितसर मराठी गाणी अल्बम चे चित्रीकरण मुहूर्त करण्यात आला. यावेळी बोलताना वाडकर म्हणाले, कोरोनोच्या संकटामुळे सर्व क्षेत्रा प्रमाणेच चित्रपट व नाट्य क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. प्रत्येक विभागाला फटका बसला असलातरी संधी देखील उपलब्ध झाली आहे. आजची परिस्थिती पाहता विविध टिव्ही चॅनेल वर सुरु असलेल्या मालिका मध्ये मराठी स्थानिक कलाकार किती आहेत. याचे कारण टॅलेंट हे होय, आपल्याकडे ते आहे पण दाखवायला हवे, कष्ट करण्याची तयारी, सातत्य, जिद्द व चांगले शिक्षण, मार्गदर्शन याची गरज असते आणि ती तूम्हाला संजय कांबळे यांच्या एस के फिल्म प्रोडक्शन यांनी उपलब्ध करून दिली आहे. असे सांगून ध्येय निश्चित करा यशाने हुरळून जाऊ नका तर अपयशाने खचू नका असा मौलिक सल्ला वाडकर यांनी देऊन मी संजय कांबळे यांच्या टिमच्या पाठिशी उभा असून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान एस के फिल्म प्रोडक्शन चे प्रमुख संजय कांबळे यांनी जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, अभिनेते मंगेश सातपुते, जिल्हा समाजकल्याण अधिकारी रमेश अवचार, शिवव्याख्याते प्रा चंद्रशेखर पाटील, लेखक दिग्दर्शक एकनाथ देसले, बांधकाम व्यावसायिक रमेश पाटील आदी पाहुण्यांचा शाल श्रीफळ व तूळशी चे रोपटे सत्कार केला. 
तर अभिनेते मंगेश सातपुते आपल्या भाषणात म्हणाले, एस के फिल्म चे कलाकार घडविण्याचे काम खूप छान व चांगले आहे. त्यांनी निर्माण केलेली गाणी महाराष्ट्र भर गाजणार व वाजणार असा विश्वास व्यक्त करून तंत्रज्ञान क्षेत्रात काही मदत हवी असेल तर ती करण्यास आपण तयार असल्याचे सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर जिल्हा समाजकल्याण अधिकारी रमेश अवचार म्हणाले, गेल्या १०/१५ वर्षापासुन मी पत्रकार संजय कांबळे यांना ओळखतो, त्यांच्या कडे जिद्द आहे, काहीतरी नवीन करण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद असून आपल्या विभागाकडून हवी ती मदत करण्यास आपण तयार असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवव्याख्याते प्रा चंद्रशेखर पाटील, लेखक दिग्दर्शक एकनाथ देसले यांनीही मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या, यावेळी टिम प्रमुख संजय कांबळे यांनी गीतकार शिवाजी पवार, नृत्य दिग्दर्शक सनी हिंदूराव, रोशन हिंदूराव यांचा पाहुण्यांच्या उपस्थित शाल श्रीफळ व तुळशी चे रोप देऊन सत्कार केला. याप्रसंगी शिवाजी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझ्या सारख्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलाला एस के फिल्म प्रोडक्शन चे प्रमुख संजय कांबळे यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले. 
मुरबाड तालुक्यातील साजई येथील कुसुमाई गार्डन येथे झालेल्या या शानदार कार्यक्रमाला निर्माता, दिग्दर्शक सुभाष मुंडे, सचिन पाटील, विस्तार अधिकारी आर आर सपकाळे, पुणे सातारा येथील टिम, धसई पळू येथील राहूल मोरे व इतर सहकारी, उशीद गावचे सुरेश गायकवाड, मांजर्ली चे संजय घारे, भगवान चौधरी, आदी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी पाटेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी पवार यांनी मानले. 

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...