नागरिक विकास पार्टीची सर्व साधारण सभा संपन्न !!
मुंबई, ०४ऑक्टोंबर : आज नागरिक विकास पार्टीची सर्व साधारण सभा संपन्न झाली यावेळी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सिंह, राष्ट्रीय महासचिव / उपाध्यक्ष डॉ ब्रिजेश पांडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष देवेंद्र सिंह सैनी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य मा. डॉ प्रमोद सुदाम हेंदुलकर तसेच राष्ट्रीय, राज्य स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महासचिव / उपाध्यक्ष डॉ ब्रिजेश पांडे यांनी पार्टीची रुपरेषा समाजावून पार्टी सदस्यांची कर्तव्य, पार्टीची उद्दीष्टे जसे
१) भारत देशाचे संविधान याचे रक्षण करणे.
२) संविधानानुसार बनविले कायदे, हक्क, व्यक्ति स्वातंत्र्य, स्री पुरुष समानता, जातीय समानता यांचे कठोर पालन करणे.
३) महिला सुरक्षा प्रदान करून महिला सुरक्षा कायदे अधिक कडक बनविणे तसेच महिलांना आत्मनिर्भर बनविणे
४) देश किंवा राज्य पातळीवरील पोलिस किंवा सैनिक यांचे आकस्मिक निधन झाले त्यांच्या वारसांना एक कोटी रुपये मदत राशी देऊन त्यांच्या परिवारातील एका सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घेणे.
५) भारत देशाच्या सुरक्षेला अतिशय महत्त्व देणे, देशाबाहेरील किंवा देशांतर्गत दुश्मनांपासुन देश सुरक्षित ठेवणे.
६) संपूर्ण जगभरात कुठल्याही देशात, प्रांतांत रहात असलेल्या भारतीय नागरिक यांना आवश्यक असेल तर सुरक्षा प्रदान करणे व कोणत्याही परिस्थितीत सरकार त्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास देणे.
६) भारत देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सरकारी आरोग्य योजना पोहचवणे ही प्राथमिकता राहील तसेच त्या आरोग्य योजना दर्जेदार असतील याची काळजी घेतली जाईल.
७) भारत देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सरकारकडून चालविलेल्या सरकारी योजनांचा लाभ पोहचविण्यात येईल.
८) देशातील नागरिकांच्या मुलभूत गरजा अन्न, वस्र, निवारा, आरोग्य, पाणी, स्वच्छता, दळणवळणाचे साधन रस्ता या सुविधा तसेच सर्वांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.
पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सिंह व राष्ट्रीय महासचिव / उपाध्यक्ष डॉ ब्रिजेश पांडे यांनी यांनी सर्वांना संबोधित करताना सांगितले की आपला पक्ष सगळे भारतवासी एक असून जातीयवाद, प्रांतवाद, भाषावाद, समाजवाद, महजब किंवा धर्म, जाती यांना थारा न देता देशातील प्रत्येक नागरिकाला सुविधा कशा मिळतील व त्यांचा उत्कर्ष कसा होईल याकडे लक्ष देईल.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व पक्षवाढीसोबत समाजासाठी काम करण्याच्या सूचना दिल्या तसेच आपल्या पार्टीचा अजेंडा " प्रथम देश, देशातील प्रत्येक नागरिक नंतर पक्ष " असा असेल हे स्पष्ट करून " देशातील प्रत्येक नागरिकाचा विकास हाच देशाचा विकास " हे प्रबोधन केले.


No comments:
Post a Comment