Saturday, 3 October 2020

माळशेज घाटमार्गे झेंडु फुलांच्या आडुन गोमांसाची तस्कर !!

माळशेज घाटमार्गे झेंडु फुलांच्या आडुन गोमांसाची तस्कर !!                 


मुरबाड (मंगल डोंगरे) : लॉकडाऊन संपल्यानंतर माळशेज घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला . जीवनावश्यक वस्तू मधील तरकारी, फळे, दुध, इत्यादींच्या गाड्या माळशेज घाट मार्गे वाशी मार्केट कडे रवाना होऊ लागल्या. 


याचा गैर फायदा गोमांस तस्करी करणाऱ्यांनी चांगलाच उठवला असुन रात्री साडेआकरा ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत पांच ते सहा टेम्पो मधुन गोमांस भिवंडी, अंबरनाथ, कल्याण ईंत्यादी शहारां मध्ये रवाना केला जातो.याचे वैशिष्ट्य म्हणजे गोमासाची तस्करी करताना पकडले जाऊ नये म्हणून गोमांस तस्करांनी नामी शक्कल शोधून काढली असून टेम्पो मधील गोमासाच्या वरील भागात झेंडुची फुले पसरण्यात येतात .त्यामुळे टेम्पो मधुन झेंडुच्या फुलांचा सुगंध दरवळतो परिणामी झेंडूच्या फुलांच्या आडुन बेमालूमपणे गोमांसाची तस्करी यशस्वी होते.गोमांस शहराकडे पोच केल्यानंतर परतीच्या प्रवासात झेंडूची फुले माळशेज मार्गा लागत असलेल्या. मामनोली, कांबा, वरप, पोटगाव,या गावाशेजारी खुलेआम पणे फेकून देण्यात येतात आणि फेकून दिलेली फुले परीसरांतील गोरगरीब नागरीक हार तुरे बनविण्यारांना विकतात .आणि मग त्याच पुलांचे हार नंतर देवाला अर्पण करण्यात येतात .वास्तविक कल्याण ते माळशेजघाटा पर्यंत एक एक किलोमीटर वर पोलिस चेक पोस्ट असुन सुद्धा बेमालूमपणे झेंडुच्या फुलांच्या आडुन गोमांसाची तस्करी यशस्वी पणे करीत असल्याने परीसरातील जाणकार नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...