मुरबाड मध्ये विद्यार्थ्यांनी काढला कँडल मार्च..
**छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहिली बहीण मनीषाला श्रद्धांजली **
मुरबाड {मंगल डोंगरे} : उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मनीषा वाल्मीकी या दलीत तरूणीवर झालेला सामुहिक बलात्कार आणी हत्या प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी व उत्तर प्रदेश पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेचा निषेध संपुर्ण भारतभर होत असतांना आज मुरबाड मध्ये तालुक्यातील विद्यार्थी वर्गाने कँडल मार्च काढून पिडीत मनीषाला न्याय देण्याची मागणी केली. व आपल्या सदभावना व्यक्त करीत भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.
यूपी मधील ही अत्याचाराची घटना तमाम भारतीयांच्या व दलितांच्या भावनांना ठेच पोहचवणारी आहे.त्याच प्रमाणे मानवतेच्या दृष्टीने निंदनीय आहे.या घटनेचा जाहीर निषेध मुरबाड मध्ये रिपाइं सेक्युलरने करून आरोपीना फाशीची मागणी केली आहे.काल मुरबाड तालुक्यातील सर्व विद्यार्थी वर्गाने एकत्र जमून कल्याण -मुरबाड तीनहात नाक्या पासून मुरबाड शहर मुख्य बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत कँडल मार्च काढून आपल्या सदभावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी 'जस्टीस फॉर मनीषा' या बॅनरखाली सुयश कॉलेज, मुरबाडच्या अनेक विद्यार्थ्यी आणि विद्यार्थिनींनी तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या कँडल मार्च मध्ये सेक्युलरचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने, नगरसेवक रविंद्र देसले, भारीपचे शंकरभाई गोहिल, राष्ट्रवादीचे हरेशभाई पुरोहित, आदिवासी नेते राजाभाऊ सरनोबत, युवा नेते अतुल देशमुख, विद्यार्थी संघटनेचे निखील अहिरे व बहुसंख्य पत्रकार मंडळी आणी तालुक्यातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.


No comments:
Post a Comment