शाश्वत शेती अभियान अंतर्गत बोंडशेत येथे माणगांव तालुका कृषी कार्यालया मार्फत जमीन आरोग्य पत्रिका वाटप व शेतकरी प्रशिक्षण !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : आज गुरुवार दिनांक ०१/१०/२०२० रोजी मौजे बोंडशेत येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वाटप कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत मृद चाचणी व एकात्मिक खत व्यवस्थापन पद्धती याविषयी शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास माणगांव तालुका कृषी अधिकारी श्री. पवार सर, व कृषिसहाय्यक श्री. सुयश नलावडे सर, श्री संतोष उगले, श्री राम कदम श्री कृष्णा शिंदे श्री अमोल गावडे श्री मधुकर शेंडे व स्वदेश फौंडेशनचे श्री गणेश शिंदे तसेच बोंडशेत गावातील शेतकरी बांधव व भगिनी उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणामध्ये श्री. पवार सर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना जमिनीचे आरोग्य व तिची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच श्री.संतोष सुरडकर व श्री. कृष्णा शिंदे, यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व शेतकरी बांधवांच्या प्रश्नाचे व शंकांचे निरसन केले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमास ४६ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वानी भोजनाचा लाभ घेऊन प्रशिक्षणाची यशस्वीरीत्या सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment