Friday, 2 October 2020

महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण भारत - नई तालीम जिल्हाधिकारी निधी चौधरींनी साधला विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद

महात्मा गांधींच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण भारत - नई तालीम जिल्हाधिकारी निधी चौधरींनी साधला विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद
     
 
       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री.बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड्.कॉलेज व मुंबई विद्यापीठ, ठाणे उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज "महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण भारत-नई तालीम" या विषयावर ऑनलाईन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीम.निधी चौधरी यांनी महात्मा गांधीजींचे विचार आजच्या पिढीसाठी किती महत्वपूर्ण आहेत, हे स्पष्ट करीत महात्मा गांधींच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखविले. या माध्यमातून समाजाचा चिरंजीवी विकास कसा साधता येईल व या विचारांच्या आधारावर बेरोजगारीसारख्या समस्यांवर कशी मात करता येईल, हे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना एक नवी दिशा दाखविली. 
      महात्मा गांधी नॅशनल काैन्सिल ऑफ रुरल एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या श्रीम.मनिषा करपे यांनी महात्मा गांधी व नई तालीम यातील संबंध स्पष्ट केला. 
      मुंबई विद्यापीठ, ठाणे उपकेंद्राच्या संचालिका डॉ.सुनिता मगरे यांनी विद्यापीठाची यातील भूमिका स्पष्ट केली.      
        महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी आपल्या प्रास्तविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करत सर्वांचे स्वागत केले. 
     कार्यक्रमाचे अध्यक्ष व आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष श्री.धनराज विसपुते यांनी महात्मा गांधी यांच्या  विचारप्रणालीनुसार व आदर्श समूहाचे कसे कार्य करते, याचे थाेडक्यात विवेचन करीत भविष्यातही या कार्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.    
       आभासी दीपप्रज्वलन, महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचा माहितीपट, नई तालीमवरील कार्याची ध्वनिचित्रफीत, वैष्णव जन हे भजन यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना नव्याने गांधीजी व शास्त्रीजी समजले.
       या कार्यक्रमासाठी झूम वर १०० विद्यार्थी कनेक्ट झाले हाेते तर फेसबुक पेजवर ३ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम लाईव्ह पाहिला. शेवटी प्राचार्य डॉ.सीमा कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शर्वरी शेडगे यांनी केले.

No comments:

Post a Comment

समाज हितासाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ते - अशोक भोईर

समाज हितासाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ते - अशोक भोईर ——————————————————————————— कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील न्...