मुरबाड तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीवर प्रशासकांंचा ताबा !!
**अधिकारी डॉक्टर आणि केंद्र प्रमुख पाहणार गावचा कारभार **
मुरबाड, (मंगल डोंगरे ) - कोरोना कोविड 19 या महामारीला सामोरे जाण्यासाठी राज्य निवडणुक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्याने आपला पाच वर्षाचा कालावधी संपलेल्या सरपंचाला पदावरून दुर करत, मुरबाड तालुक्यातील सुमारे 41 ग्रामपंचायतीवर केंद्र प्रमुख, शाखाअभियंता, विस्तार अधिकारी, व पशुधन अधिकारी ह्यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती करत असल्याने ते आज पासुन प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारत आहेत.
ग्रामीण भागातील गावचा प्रथम नागरिक म्हणून संपुर्ण गावाची जबाबदारी असणारा सरपंच तो सुशिक्षित असो किंवा अशिक्षित मात्र तो गावच्या विकासासाठी जो निर्णय घेईल तो सर्वानी मान्य करायचे. आणि तो ठराव प्रस्ताव ग्रामसेवकांनी पुढे मंजुरीसाठी पाठवायचा मग ती योजन असो किंवा कोणते विकास काम असो ते मंजुर केव्हा झाले. त्याचा निधी कुठे खर्च झाला हे ग्रामसेवक आणि सरपंच यांनाच माहीत. म्हणुन सरपंच पदाची खुर्ची मिळावी यासाठी वडलोपार्जित मिळकतीचा विचार न करता ती निवडणुक लढण्यासाठी कवडीमोलाने विक्री करणाऱ्या सुमारे 41 सरपंचाची मुदत 19 नोव्हेंबर 2020 रोजी संपल्याने कोरोना कोविड 19 या राष्ट्रीय आपत्तीमुळे त्या ग्रामपंचायतीच्या मुदतपूर्व निवडणुका घेणे निवडणुक आयोगाला शक्य झाले नसल्याने आपला काळावधी संपल्याने सरपंचाला आपल्या पदापासून दुर व्हावे लागत आहे. मात्र सरपंच नसेल तर गावच्या विकासकामांचा व वेगवेगळ्या उपाययोजनांचा पाठपुरावा करण्यासाठी पुर्वी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांची नेमणुक प्रशासक म्हणून करण्यात येत होती. आणि ते सरपंच पदाची जबाबदारी पार पाडत होते. कारण त्यांना ग्रामपंचायत चे कारभाराचा पुर्णतः अभ्यास होता. मात्र या ग्रामपंचायतीच्या कारभाराचा कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसणाऱ्या केंद्र प्रमुख, शाखा अभियंता, पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडे प्रशासनाने ग्रामपंचायत चा कारभार सोपविला असला तरी पंचायत समितीकडे सुमारे 50% अधिकारी वर्गाची कमतरता असल्याने एकेका अधिकाऱ्याकडे दोन- तीन कार्यभार आहेत. शिवाय त्यांचेकडे आता ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने आठवड्याचे पाच हि दिवस त्यांना सतत कामाचे तणावात काम करावे लागणार असले तरी अशिक्षित सरपंचापेक्षा एक उच्चपदस्थ अधिकारी ती जबाबदारी पार पाडत असल्याने सध्या गटतट आणि राजकीय वादावर पडदा पडला असुन सुशिक्षित नागरिकाकडुन आयोगाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.
**पंचायत समिती च्या सर्वच विभागात अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने एकेका अधिकाऱ्याकडे दोन तीन पदभार आहेत. शिवाय शासनाचे आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या प्रशासकाचा कार्यभार देखील त्यांचेवर सोपविण्यात आला असल्याने अधिकारी तणावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यांचेशी चर्चा करणार आहे. संघरत्ना खिल्लारे. गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड.
** ग्रामपंचायत चे प्रशासक **
आगाशी-चंद्रशेखर भालेकर.पशुधन पर्यवेक्षक
आंबेगाव-काशिनाथ हिरु शेलवले.केंद्रप्रमुख
आंबेटेभे- दिलीप धानके.पशुधन पर्यवेक्षक
आसोसे- राजेंद्र पाटील. पशुधन पर्यवेक्षक
कान्हार्ले- विसावले .शाखा अभियंता
खांदारे- परमेश्वर पोटे.पशुधन पर्यवेक्षक
बांधिवली -ललित सुभाष बडगुजर.विस्तार अधिकारी क्रुषी
भुवन-सुभाष वाघचौरे.पशुधन पर्यवेक्षक
बोरगाव -संजय धनगर -केंद्र प्रमुख
धानिवली-रविंद्र चौधरी विस्तार अधिकारी क्रुषी
चिरड-आनंद मुरेकर.विस्तार अधिकारी
डेहनोली-एस एम महाजन .शाखा अभियंता. ल.पा.
देवपे- उल्हास घोलप.केंद्रप्रमुख
देहरी-जयवंत धलपे.केंद्रप्रमुख.
फणसोली-बाबाजी धनगर. केंद्रप्रमुख
कलमखांडे-जे.पी.बनकरी.शाखा अभियंता. पा.पु
करवेळे-शंकर भोईर. केंद्र प्रमुख
केदुर्ली-पी.एम बालोडे.शाखा अभियंता. बांधकाम
खानिवरे-चेतन महाला.शाखा अभियंता. बांधकाम
खांडपे- भागवत दौड.पशुधन पर्यवेक्षक
खाटेघर- पराग भोसले.विस्तार अधिकारी.
माल्हेड-ए.ए.सैय्यद शाखा अभियंता बांधकाम
मानिवली.बु।।लता निकम केंद्र प्रमुख
मानिवली शि।।ए.ए.सय्यद शाखा अभियंता बांधकाम
मासले- तुकाराम जंगम.शाखा अभियंता. बांधकाम
म्हसा- आनंद मुरेकर.विस्तार अधिकारी
मोहोप- गजानन सुरोशे .विस्तार अधिकारी.
नागाव- ए.सी.बडगुजर. शाखा अभियंता लपा
नारिवली- चेतन महाला. शाखाअभियंता
पाटगाव- रविंद्र चौधरी.विस्तार अधिकारी क्रुषी।
पोटगाव- गजानन सुरोशे
सरळगाव-पराग भोसले
शिदगाव-के.के.सासे.
शिरवली मा।। जे.पी.बनकरी.
शिरगाव-विसावले.शाखा अभियंता
शिवळे-पराग भोसले.विस्तार अधिकारी
तुळई-सुरेखा बंदसोडे.केंद्र प्रमुख
उचले-ए.सी.बडगुजर शाखा अभियंता
विढे- परमेश्वर पोटे.पशुधन पर्यवेक्षक
वाघिवली-रविंद्र चौधरी
गवाळी - दिलीप धानके.
No comments:
Post a Comment