मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड कृषि उत्पन्न बाजार समितिच्या मुख्य बाजार आवारात दर शुक्रवारी शेती उत्पादित मालाचा व भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरत होता. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार लाँकडाऊन सुरु झाल्या पासून आजपर्यंत बंद आहे. त्यामुळे शेतकरी, छोटे व्यापारी यांचे व बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. मुरबाड तालुका हा शेती उपजीविकेवर अवलंबून असलेला शेतकऱ्यांच्या तालुका आहे. मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण मुरबाड तालुका असून समितिच्या कार्यक्षेञातील तसेच कार्यक्षेञा बाहेरील शेतकरी ,व्यापारी व ग्राहक यांचे सोयीसुविधे साठी समितिच्या मुरबाड बाजार आवारात शेतीउत्पादित माल, सर्व प्रकारचा भाजीपाला, कांदा, बटाटा ,फळे, फुले इत्यादी खरेदी -विक्री करिता तसेच शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांना एकाच ठिकाणी ताजा भाजीपाला, सुकी मच्छी व शेती उत्पादित माल मिळावा म्हणून आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी मिळावी अशी समितिच्या वतिने मुरबाड नगरपंचायत प्रशासना कडे मागणी केली आहे. कोरोना विषाणू संबंधी शासनाचे सर्व नियम व अटींचे पालन मुरबाड बाजार समिती तयार असून शासनाने आता अनलाॕक प्रक्रिया सूरु केले आहे. राज्यातील अनेक महत्त्वाचे व मोठ्या बाजासमित्या सूरु झाल्या असल्याने मुरबाड आठवडी बाजार सूद्धा सूरु करण्याची परवानगी द्यावी अशी लेखी मागणी बाजार समितिच्या वतीने केली आहे.
**बाजार समितीच्या मागणीचा सकारात्मक विचार करुन त्यावर चर्चा करुन पुढिल निर्णय घेतला जाईल - 'परितोष कंकाळ, मुख्याधिकारी' नगरपंचायत मुरबाड**
No comments:
Post a Comment