मुरबाड - (मंगल डोंगरे) : नुकताच मुरबाड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असून 'सरपंचांच्या जागेवर प्रशासक बसले असुन आता गावच्या विकासाच गावगाडा प्रशासक बघणार आहेत.राज्य निवडणूक आयोग निवडणूकीची घोषणा करत नाही तो पर्यत गावचा कारभार प्रशासक पाहणार आहेत. मागील पाच वर्षात तालुक्यातील काही सरपंच /उपसरपंच यांनी गावातील लोकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामधे काही ठिकाणी सरपंच /उपसरपंच / सदस्य यांची ग्रामस्थांनी बिनविरोध निवड केली होती . यातिल मुरबाड तालुक्यातील जामघर -खांदारे ही एक ग्रामपंचायत होती. या मध्ये २०१५ मध्ये जामघर गावातून विनायक जामघरे या सुशिक्षित तरुणाची प्रथम बिनविरोध सदस्य व नंतर बिनविरोध पाच वर्ष उपसरपंच पदी निवड झाली होती. या पंचवार्षिक मध्ये त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्या लोकांपर्यत नेऊन त्यांची यशस्वी अंमलबजावणी करुन घेतली. हे सर्व करत असताना त्यांना खांदारे - जामघर येथिल ग्रामस्थ , ग्रामपंचायतचे सदस्य , सरपंच , ग्रामसेवक, तालुक्याचे सभापती , गटविकास अधिकारी व तहसिलदार मुरबाड या सर्वांनी यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले असल्याने 'ग्राम पंचायतचा कार्यकाळ संपताच उपसरपंच विनायक जामघरे यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.
या सर्वांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभल्याने आपण पाच वर्षे जनतेची सेवा करु शकलो असे भावनिक उद्गार विनायक जामघरे यांनी काढले.
No comments:
Post a Comment