महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० ; परिपूर्णतेचे प्रतिबिंब', महाअंतिम स्पर्धेत "मेधा जोशी" प्रथम !
प्रकाश संकपाळ : सातारा - येथील महाबळेश्वरमध्ये महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० परिपूर्णतेचे प्रतिबिंब' ही स्पर्धा कुसुमवत्सल फाउंडेशन व सहारा प्रोडक्शन हाऊस च्या सहकार्याने 'महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० या परिपूर्ण प्रतिबिंब असलेल्या एकापेक्षा एक, सरस ठरलेल्या व अखेरच्या श्वासापर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या या महाअंतिम स्पर्धेत मेधा जोशी, गौरी पांडे, अनामिका ओव्हाळ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. अंतिम फेरीतील ३० स्पर्धकांमधून दहा विजेत्यांची ही निवड करण्यात आली, त्यामध्ये स्मिता जाधव, वर्षा शिंदे, सोनल कदम, स्वीटी दर्डा, मेधा जोशी, गौरी पांडे, अनामिका ओव्हाळ, जागृती काणेकर, विद्या कोतवाल, सारिखा शेठ यांचा समावेश होता.
या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा महाबळेश्वर येथील योगदा रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत परदेशातील मलेशिया व लंडन या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली,सातारा,बारामती, नागपूर, नांदेड,लातूर,यवतमाळ, गडचिरोली, सोलापूर,धुळे जळगाव,नाशिक अशा अनेक जिल्ह्यातून विवाहित सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत मॉडेल्सना प्रश्नोत्तरे, कौशल्य, रॅम्पवॉक त्याचबरोबर स्विमिंग पूल राउडअप असे विविध प्रकारचे राऊंडस घेण्यात आले होते.
एकविसाव्या शतकातील स्त्रीचे सशक्त रूप जगासमोर येण्यासाठी आणि आजच्या युगातील स्त्रीला मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या उत्कृष्ट स्पर्धेची संकल्पना महान समाजसेविका व फॉउंडेशन च्या संस्थापिका अध्यक्षा वैशालीताई पाटील, सहारा प्रोडक्शन हाऊसचे अध्यक्ष डॉ. भवाळकर, रुणवाल ग्रुपचे प्रदीप गायकवाड, हरिश्चंद्र दांगट, कल्याण राव, अवताडे, मिलिंद पानसरे, देसाई मॅडम, व्ही. दिलीप, सामाजिक कार्यकर्त्या भारती चंगेडिया, संशोधन आणि विकास प्रमुख शर्वरी डोंबे,डॉ.अपूर्वा अहिरराव, वैशाली चिपलकट्टी,रणरागिनी बाउन्सर ग्रुपच्या अध्यक्ष दीपा परब कुसुमवत्सल्य संपूर्ण टीम उपस्थित होते.
या महाअंतिम स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून 'गेट सेट गो'च्या प्रमुख श्रध्दा भवाळकर, मिडाज टच'च्या अंजली जोशी, पूनम परदेशी, योगिराज कामठे, प्रख्यात गृमिंग एक्सपर्टच्या देवश्री चक्रवर्ती यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment