मुरबाड संजय गांधी निराधार योजनचे अनुदान मिळण्यासाठी तहसीलदारांना निवेदन !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) :
मुरबाड तालुक्यातील निराधार विधवा महिला व दिंव्यांग व्यक्तींसाठी संजयगांधी निराधार योजना मार्फत मिळणारे मासिक अनुदान गेले दोन महिने न मिळाल्यामुळे मुरबाड तालुक्यातील निराधार महिला व दिंव्यांग व्यक्तीना आर्थिक अडचण येते असल्याने सुपरस्टार आॅल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेच्या वतीने मुरबाड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
तहसीलदार साहेबांनी सदर निवेदनाची दखल घेऊन त्वरित कार्यवाही आदेश संबंधित यंत्रणेस दिले असुन लवकरच अनुदान दिले जाईल असे आश्वासन दिले.
सदर निवेदन देताना सुपरस्टार आॅल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भालेराव राज्य जेष्ठ सल्लागार राजाभाऊ सरनोबत राज्य सचिव लक्ष्मण पवार ठाणे जिल्हा सरचिटणीस रोहित झुंजारराव मुरबाड तालुका अध्यक्ष महादु भोईर प्रथमेश सावंत चिंतामण माळी अदि पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment