जिल्हा रुग्णालयाचा वापर नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्याच्या जागेची पाहणी प्रक्रिया पूर्ण !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग या रुग्णालयातील रुग्ण खाटांचा वापर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील अलिबाग येथे नियोजित नवीन शासकीय महाविद्यालयासाठी वापर करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुषंगाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचाही पाठपुरावा सुरूच हाेता. या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयाचा वापर करण्यास शासन मान्यता दिलेल्या जागेची आज मुंबई जे.जे.रुग्णालयाच्या न्याय वैद्यकीय विभागाचे प्राध्यापक डॉ.गजानन चव्हाण, सहयोगी प्राध्यापक डॉ.आनंद शिनगारे, अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांनी पाहणी करुन याबाबत सकारात्मक चर्चाही करण्यात आली.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने व जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment