Tuesday, 3 November 2020

ओबीसी समाजाच्या न्याय हक्क 'आरक्षण व विविध मागण्यांसाठी मुरबाड तहसील वर आक्रोश मोर्चा !!

ओबीसी समाजाच्या न्याय हक्क 'आरक्षण व विविध मागण्यांसाठी मुरबाड तहसील वर आक्रोश  मोर्चा !!


मुरबाड--{मंगल डोंगरे} : ओबीसी समाजाच्या न्याय हक्क 'आरक्षण व विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक तालुक्यांत सर्व ओबीसी संघटना व ओबीसींतील जातसंघटनांनी एकत्रित येऊन आक्रोश आंदोलन केले व तहसीलदारांच्या मार्फत ओबीसी समाजाच्या मागण्यांची निवेदने मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांना पाठवली. त्याच अनुषंगाने मुरबाड तालुक्यातील ओबीसी समाजबांधव एकत्र येऊन शहरातील शिवाजी महाराज चौकातून मोर्चा काढुन मोर्चाच्या वतीने मुरबाड  तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.


         या मागण्यांमध्ये पुढील होणा-या राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जनगणना स्वतंत्र रकान्यात केंद्र सरकारने करावी. यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा. अन्यथा राज्यातील ओबीसी समाजासह सर्वांचीच जातनिहाय जनगणना राज्य सरकार ने करावी या प्रमुख मागणीसह ओबीसींच्या तुटपुंज्या आरक्षणात अन्य जातींचा समावेश करून शासनाने ओबीसींवर अन्याय करू नये, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हावार वसतीगृहे सुरू त्वरीत सुरू करावीत, बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर ओबीसींच्या महाज्योती संस्थेला 1000 कोटींच्या अनुदानाची भरीव तरतूद करावी, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवावी, एससी, एसटी समाजांप्रमाणे विविध योजना, सवलती लागू कराव्यात अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
       यावेळी ओबीसी समाजातील नेते माजी आमदार दिगंबर विशे सर 'माजी उपसभापती दिपक खाटेघरे' 'रामभाऊ दळवी''शांताराम बांगर तात्या' विशे तात्या 'सभापती श्रीकांत धुमाळ' 'माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी' 'जि.प.सदस्या रेखा ताई कंटे' खरेदी विक्री संघाचे प्रकाश पवार सर 'नाभिक समाजाचे कचरु खंडागळे' 'वैश्य समाजाचे सुधीर तेलवणे' यांसह संपूर्ण ओबीसी समाजातील शेकडो समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !!

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !! पुणे, रवी भिसे : प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांच्या देव गिल प्रोडक्श...