कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!
कल्याण, प्रतिनिधी : आज कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष हरीश कांबळे तसेच आरपीआय कल्याण तालुका युवक अध्यक्ष मिलिंद भोईर तसेच मांडा टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मढवी यांनी काँग्रेस पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी मोहोने टिटवाळा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश वाघमारे, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष सलीम भाई शेख, मोहोने टिटवाळा महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष उर्मिला भोईर, मांडा विभाग महिला अध्यक्षा दर्शना पानपाटील, अमोल गायकवाड, मोहोने गावठाण वॉर्ड अध्यक्ष विवेक घोडके तसेच असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
लवकरच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव आमचे मार्गदर्शक संजयजी दत्त साहेब यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा मेळावा घेणार असुन शेकडो कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश देखील होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजाभाऊ पातकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment