'पडघे ' गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा !
आमच्या आयुष्याचं केलं सोनं
देहाचे झिजून केले चंदन...
ज्ञानाच्या महासागराला
अंतःकरणातून कोटी, कोटी वंदन...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे प्रेरणास्थान आहेत.
महाराष्ट्र म्हटला तर डाेळ्यासमाेर पुराेगामी महाराष्ट्र उभा राहताे. या महाराष्टखूप ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि ताे वारसा येथील महानायक आणि महानायिका यांच्यामुळे. महाराष्ट्र मधील जिल्हे असाे, की तालुके किंवा खेडे पण कुठेतरी ऐतिहासिक बाबी आढळतीलच, असाच ऐतिहासिक वारसा लाभलेला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच पदस्पर्श लाभलेलं गाव म्हणजे पडघे....
पडघे अनेक खेडे गावांचा एक आर्थिक उलाढाल आणि महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला आहे. निसर्गरम्य आणि भिवंडी तालुक्याच्या कुशीत वसलेल्या पडघे गावाला ह्या संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बाेधिसत्व , विश्वरत्न,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्श लाभले. ही पडघे गावासाठी अभिमानस्पद बाब ठरली आहे. आणि ही एक न पुसता येणारी ऐतिहासिक साेनेरी रेषा आहे. आज मला अभिमान वाटताे की ,मी या पडघे गावच्या मातीत जन्माला आलाे खरंच, आज मन भरून येत आहे, अनेक पिढ्यांच्या जीवनाचे साेनं करणारा घटनासम्राट ह्या मातीत आला आणि मातीच आज साेनं करून गेला. नवतरुणाममध्ये एक चैतन्य निर्माण करणारी ही घटना आहे. प्रत्येकाच्या हृदयावर काेरणारी ही घटना आहे. सर्वांच्या मनात एक घर करणारी ,अभिमानास्पद घटना आहे. पडघे गावातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटणारी ही घटना आहे. आम्ही ज्या गावात राहताे त्या गावांमध्ये घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भिवंडी तालुक्यातील पडघे या गावात आले हाेते. पडघे समतानगर येथील जेष्ठ नागरिकांकडून ऐतिहासिक दाखले नेहमीच मिळत असून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आले हाेते, असा त्यांच्या आठवणींना त्यांच्याकडून उजाळा मिळताे.
ठाणे जिल्ह्यातील आणि भिवंडी तालुक्यातील पडघे हे गाव शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू म्हटले जाते. या पडघे गावातून अनेक सामाजिक कार्यकर्ते घडले. क्रांतीसुर्य महात्मा ज्याेतिबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महाेत्सव २५ गावे पडघे विभाग आयाेजित क्रांतीसुर्य महात्मा ज्याेतिबा फुले व विश्वरत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याकरिता पडघे परिसरातील अनेक युवा सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आणि माेठ्या जाेमाने काम करू लागले. क्रांतीसुर्य महात्मा ज्याेतिबा फुले व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती पडघे विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन १९९०- १९९१ काळात महात्मा ज्याेतिबा फुले स्मृर्ती दिनानिमित्त शताब्दी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी निमित्त क्रांतीसुर्य, प्रज्ञासूर्य यांची जयंती पडघे विभागात सूरू झाली सुरू केली. त्यावेळी नामवंत साहित्यिक सामाजिक कार्यकर्त्यांना पडघे येथे जयंती निमित्त प्रबाेधनासाठी बाेलावण्यात आलं हाेते. कार्यक्रमासाठी २५ गावे एकत्र येतात. हळूहळू हा संयुक्त जयंती साजरी करण्याचा वारसा तरुणांनी हाती घेतला आहे. तर विविध सामाजिक उपक्रम नवतरुण राबवत आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली हाेती आणि पाणी सत्याग्रहही केला हाेता. चहा , पाणी घेतले हाेते. त्या आठवणीला पडघ्यातील नागरिक नेहमीच उजाळा देत असतात.
आम्ही लहान होतो, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडघ्यात आले होते. सतीच्या विहिरीवर पाणी सत्याग्रह केला होता. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त होते.पडघा येथिल एका शिसवीच्या झाडाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली होती,मुलांना तुमच्या शिक्षण द्या असे डॉ. बाबासाहेबांनी सभेमध्ये नागरिकांना संबोधित केले होते . समतानगर येथील काशिनाथ हाशाबा दोंदे यांच्या घरी चहापाण्यासाठी थांबले होते. पडघे परिसरात ही बातमी तेव्हा वाऱ्यासारखी पसरली होती .अशी आठवण समतानगर येथील आजी हिराबाई दुंदांजी सोनावणे ( वय ९५ ) यांनी माझ्याशी बोलताना सांगितली आहे.
पडघे, समतानगर येथिल दिवंगत हाशाबा दोंदे हे त्या काळातील एक सामाजिक कार्यकर्ते होते. काशिनाथ दोंदे हे आरटीओ मध्ये अधिकारी होते. समतानगर गावातील एकमेव जमीनदार आणि त्यांचे समतानगर येथील घर म्हणजे "मोठे घर" म्हणून प्रसिद्ध आणि त्या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चहा,पाणी घेतला होता,समतानगर येथे देखील दोंदे परिवाराच्या घराला त्यांच पदस्पर्श लाभले असून, समतानगर मधी देखील दोंदे कुटूंबाच्या "मोठे घर" येथे डॉ.बाबासाहेबांच्या पाऊलखुणा सापडतात.
पडघे येथिल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद रामचंद्र साने (वय ७९ ) गेल्या वीस वर्षांपासून सतीची विहीर वाचविण्यासाठी , संंवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत त्यासाठी ते नेहमीच संघर्ष करीत आहेत. सतीच्या विहिरी संदर्भात अनेक कागदपत्रे त्यांनी आज पर्यंत सांभाळून ठेवली आहेत.
पडघे हा एक ऐतिहासिक वारसा लाभलेला गाव आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पडघे येथील सतीची विहीर साक्ष देत आहे. जेव्हा ही घटना आम्ही पुस्तकामध्ये वाचतो तेव्हा आमच्या तरुण कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा मिळते. ज्या महामानवाने या भारत देशाची राज्यघटना लिहिली. असा घटनाकार एका खेड्या गावामध्ये पाण्यासाठी सत्याग्रह करतात. समतानगर येथे येऊन दोंदे कुटुंबाकडे चहा पाणी घेतात. त्याच गावात आम्ही राहतो तर आम्हाला येथील प्रत्येक नागरिकाला नक्कीच या गोष्टीचा अभिमान वाटतो.आणि आमचं मन अभिमानाने फुलून येतं . अनेक पुढारी होऊन गेले. अनेक पुढारी निर्माण होतील. त्यामध्ये नक्कीच प्रत्येकाच्या ओठावर असणार नाव म्हणजे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर....
क्रांती निर्माण करण्यासाठी
सारे एक होऊनी घेऊया शपथ...
डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
पुढे नेऊया समतेच्या चळवळीचा रथ...
लेखक - मिलिंद सुरेश जाधव
पडघा, भिवंडी मो. ८६५५५६९४३६
No comments:
Post a Comment