कोरोना थांबलाय संपला नाही !!
**दिवाळी सणात नागरिकांनी काळजी घ्यावी. आरोग्य अधिका-यांचे जनतेला आवाहन **
मुरबाड - {मंगल डोंगरे} : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाची वाढती दहशत आत्ताशी थांबली आहे. मात्र संपली नाही. यास्तव मुरबाडकरांनी दवाई नही तबv तक ढिलाई नही, अन्यथा दुसऱ्या फेरीत काही खरं नाही. दिवाळी सणात नागरिकांनी मास्क लावा हात धुवा व जबाबदारीने वागण्याचा इशारा तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे या कोरोनाचा फटका त्यांना देखील चांगलाच बसला होता. मुरबाड तालुक्यात गेल्या सहा महिन्यात ११२९ रुग्ण बरे झाले असून या महामारीत ५३ नागरिकांचा बळी गेला आहे. येत्या आठवड्या भरापासून नवीन रुग्ण सापडत नाही. खाजगी कोविड सेंटर बंद करण्यात आले असून शासकीय कोविड सेंटर व आरोग्य सेवा २४ तास उपलब्ध आहे. यास्तव नागरिकांनी मास्कचा वापर, सानिटायर गरम पाण्याने हात धुवायला हवे. अपण सुरक्षितता बाळगण्यास कोरोनाला खच्ची करण्यात यश येईल. मौसम बदलतात त्याप्रमाणे साथीचे रोग फैलावत तर आपण घाबरून न जाता शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचार मिळतोच. परंतु कोरोनाला हरवायचे, कायमचे घालवायचे असल्यास आपली सुरक्षा आपणच करायची असे आवाहन मुरबाड तालुका वैद्यकीय अधिकारी बनसोडे यांनी केले नागरिकांना केले आहे ,हिवाळा सुरू होत असल्याने काही साथीचे रोग देखील डोके वर काढतात त्या साठी आरोग्य सेवा सज्ज असून फक्त आपण काळजी घेतली तर आपलं कुंटूब व तालुका सुरक्षित राहिल •
No comments:
Post a Comment