अॅट्रोसिटी केस मधील फिर्यादीला उच्चन्यायालयाचा दिलासा...!
मुंबई (प्रतिनिधि) : किशन प्रेमजी अग्रवाल या पुणे स्थित व्यावसायिकाने सोलापुर येथील अनुसूचित जातीच्या व्यक्तिवर जातीय द्वेषभावनेतुंन सन २०१३ मध्ये अत्याचार केला होता या संदर्भात मंद्रूप पोलिस ठाणे, सोलापुर येथे अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होवुन सदर गुन्ह्याचे दोषारोप पत्र माननीय न्यायालयात दाखल होते.
सदर अॅट्रोसिटी गुन्ह्यात दाखल असलेले दोषारोप पत्र रद्द करण्याबाबत आरोपी किशन प्रेमजी अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालय अपील क्र.२२९१/२०२० अन्वये याचीका दाखल केली होती.
किशन प्रेमचंद अग्रवाल यांचेवर अंकुष माळशिदा डावरे यांनी केलेल्या तक्रारीअंती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ चे कलम ३(१) (१0) ना.ह.स कायदा कलम ७(२) (३) तसेच भा.द.वि ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सखोल तपासाअंती सदर गुन्ह्यांमध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
सदरचे दोषारोप पत्र रद्द करण्यासाठी किशन अग्रवाल यांनी सन्माननीय उच्च न्यायलयात धाव घेतली होती.
सन्माननीय उच्च न्यायालया कडून दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले मात्र सन्माननीय न्यायालयाकडुन दोषारोप पत्र रद्द करण्याची शक्यता नसल्याचे लक्षात येताच किशन अग्रवाल यांनी सदरचे अपील मागे घेतले. तक्रारदार तथा अॅट्रोसिटी पिडित इसम अंकुष डावरे यांचे तर्फे अॅड.शुभम घरबुडवे आणि अॅड.अक्षय तीळवे यांनी सक्षम पणे व जोरदार युक्तिवाद करून बाजू मांडली. विशेष म्हणजे अॅड.शुभम घरबुडवे यांची उच्च न्यायालयातील पहीलीच केस होती. या उमद्या वकीलाने प्रथमच उच्चन्यायालयात प्रभावीपणे युक्तीवाद करुन यश संपादन केल्याने त्यांचे समाजातील सर्वस्थरातुन कौतुक होत असून अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष रविंद्रदादा जाधव, प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित, कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके आणि इतर अनेक मान्यवरांकडून त्यांचेवर अभिंनदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment