पथराड चे विद्यार्थी नियमित ऐकताय शाळेबाहेरची शाळा कार्यक्रम. !!
*कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकमित्रांची मदत*
कजगाव : कजगाव येथून जवळच असलेल्या पथराड येथे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव आणि 'प्रथम एजुकेशन फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने *शाळेबाहेरची शाळा* कार्यक्रम दि. ५ नोव्हेंबर पासून जळगाव आकाशवाणी वरून प्रसारीत व्हायला सुरुवात झाली. याआधी हा कार्यक्रम फक्त नागपूर आकाशवाणी केंद्रावर ऐकता येत होता .हा कार्यक्रम आठवड्यातून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार रोजी प्रसारीत होत असून कार्यक्रमाची वेळ सकाळी १०:३० अशी असते .
शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यासाठी राबविला जात असून पथराड येथील जि. प. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम सुरुवाती पासून शाळेत स्पीकर व एल ई डी टी. व्ही. द्वारे ऐकविला जात होता. परंतू कोविड-१९ जागतिक महामारी व शेतीची कामे यामुळे सर्व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नव्हते .तेंव्हा शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी गावातील सुशिक्षित व शिक्षणप्रेमी मुलांची भेट घेऊन गावातील चौका चौकात शाळेबाहेरची शाळा कार्यक्रम ऐकविण्यास सांगितले तेंव्हा चेतन शिवाजी पाटील आणि मुकेश शांताराम पाटील दोघांनी कार्यक्रम ऐकविण्यास तात्काळ होकार दिला. आणि त्या दिवसापासून दोघेही दररोज संध्याकाळी ठिक ५:३० वाजता गावातील चौकात शाळेतील स्पीकर च्या सहाय्याने मोबाईल मधे प्रथम महाराष्ट्र या अप्लीकेशनच्या सहाय्याने शाळेबाहेरची शाळा कार्यक्रमाचे वीडियो स्वरूपातील व ऑडियो स्वरूपातील भाग दररोज एक या प्रमाणे ऐकवीतात तसेच त्यासोबत इंग्रजी आणि गणित विषयाचे यू ट्यूब वरील वीडियो विद्यार्थ्याना दाखवितात मनोरंजन म्हणून विविध बोधपर गोष्टी पण ऐकवितात. शाळेतील शिक्षक यांनी आपापल्या वर्गाचे विद्यार्थी व पालक यांचे व्हाट्स अप चे ग्रूप तयार केलेले आहेत. त्या ग्रूप्स वर शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमासंदर्भात आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी येणारा अभ्यास नियमित पाठविला जातो आणि त्या अभ्यासावर आधारित कार्यक्रमाचे प्रसारण दुसऱ्या दिवशी ऐकविले जाते. चेतन पाटील आणि मुकेश पाटील या शिक्षक मित्रांच्या सहाय्याने कार्यक्रम शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम खूपच यशस्वी होत आहे. कार्यक्रमासाठी खूपच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्याँची उपस्थिती असते. पालक ही काही प्रमाणात उपस्थित असतात. त्यामुळे गावातील पालक खूपच उत्साहीत आहेत. पालकांनी आपल्या अन्ड्रोइड मोबाईल मधे शाळेबाहेरची शाळा कार्यक्रम ऐकण्यासाठी pratham maharashtra अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास शिक्षकांनी सांगितले असून ते कसे वापरावे याविषयी पण माहिती विद्यार्थी व पालक यांना देण्यात आली आहे. तसेच त्या अप साठी लिंक पण सर्वाना देण्यात आली आहे .
शाळेबाहेरची शाळा कार्यक्रम नियमितपणे गावातील चौकात ऐकविला जात असल्याने भडगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी विस्तार अधिकारी गणेश पाटील आणि केंद्र प्रमुख एस. बी. नहिंदे यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे तसेच शिक्षक मित्र चेतन पाटील व मुकेश पाटील यांचे अभिनंदन करून गौरविले. कार्यक्रम यशस्वी होने कामी शाळेचे मुख्याध्यापक सुकदेव माळी उपशिक्षक दीपक भालेराव, नंदू पाटील व प्रविण पाटील यांचे सह शिक्षक मित्र चेतन पाटील व मुकेश पाटील मेहनत घेत आहेत.
Nice
ReplyDelete