Thursday, 5 November 2020

कल्याण मटका चालवणाऱ्या चौघांवर गुन्हा !

कल्याण मटका चालवणाऱ्या चौघांवर गुन्हा !


निगडी,पुणे - कल्याण मटका जुगार चालवणा-या चार जणांवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावरून मोबईल फोन, रोख रक्कम आणि मटका खेळण्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.४) संध्याकाळी पावणेसात वाजता अजिंठानगर, निगडी येथील सार्वजनिक रोडवर केली.

मटका चालक विकी विलास गजरमल (वय ३०), रायटर दीपक बाळासाहेब बनसोडे (वय २७, दोघे रा. अजिंठानगर, निगडी), संतोष सुरेश नवगिरे (वय ३२, रा. चिखली), कटिंग घेणारा प्रफुल्ल (पूर्ण नाव माहिती नाही. रा. मोरेवस्ती, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंठानगर निगडी येथे सार्वजनिक डांबरी रोडवर काहीजण कल्याण मटका जुगार चालवत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली, त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून चार जणांवर भारतीय दंड विधान कलम 188, 269, 34, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ, साथीचा रोग अधिनियम 1897 कलम 3, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 2005 चे कलम 51 ब, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे कलम 11 नुसार निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्यांच्याकडून मोबईल फोन, रोख रक्कम आणि मटका खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !!

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !! पुणे, रवी भिसे : प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांच्या देव गिल प्रोडक्श...