कोरोनाच्या नावाखाली जनतेची चाललेली लूट त्वरित थांबवा - 'दयानंद चौधरी'
ना.पियुष गोयल रेल्वे मंत्री भारत सरकार यांच्याकडे ईमेलवर पत्र पाठवून केली मागणी
मुंबई (समीर खाडिलकर) :
मार्च महिण्यापासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर बरेच महिने प्रवाशी वहातुक बंद केली होती. कोरोनाचा असर जसजसा कमी होत आहे,तशा आपण लांब पल्ल्याच्या गाड्या चालू करीत आहात. पण हे करत असताना आपण या गाड्या रेग्युलर नावाने न चालविता हॉलिडे स्पेशल नावाने चालवल्या जात आहेत. त्यामुळे जनतेची लूट होत आहे ती त्वरित थांबवणे आवश्यक आहे असे पत्र दयानंद चौधरी यांनी ना.पियुष गोयल रेल्वे मंत्री,भारत सरकार यांना ईमेलवर पाठवून मागणी केली आहे.
त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ट्रेन त्याच आहेत, स्टेशनचे थांबेही तेच आहेत, पण तिकीट दर भलतेच वाढवलेले आहेत.हॉलिडेच्या नावाखाली जेष्ठ नागरिकांचे कन्सेशनही बंद करण्यात आले आहे, हे कितपत योग्य आहे, बुरख्याच्या आडून जनतेची केलेली ही लूट आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.जनता समजत असतानाही हा अन्याय सहन करतेय. ट्रेन कमी चालत असल्या तरी, चुकीच्या या धोरणामुळे, रेल्वेचं उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे,आणि जनतेचे मात्र नुकसान होत आहे.म्हणून दयानंद चौधरी यांनी ई-मेल द्वारे जनतेच्यावतीने विंनती केली आहे की,आपण त्वरित या प्रकरणात लक्ष घालून, हॉलिडे स्पेशलच्या नावाखाली जेष्ठ नागरिकांची आणि सामान्य जनतेची होणारी लुट त्वरित थांबवावी व जनतेला दिलासा द्यावा.
No comments:
Post a Comment