Thursday, 19 November 2020

तरुणांच्या मृत्यूने कल्याण तालुका हादरला, किरकोळ कारणानं मृत्यू, तालुक्यात भिंतीचे वातावरण?

तरुणांच्या मृत्यूने कल्याण तालुका हादरला, किरकोळ कारणानं मृत्यू, तालुक्यात भिंतीचे वातावरण?


कल्याण (संजय कांबळे) : ऐन तारुण्यात मांजर्ली गावातील दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पावशेपाडा येथील  अजिंक्य गणेश पावशे या तरुणांचा देखील असाच अचानक मृत्यू झाला असून कांबा पावशेपाडा गावावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे हे सर्व मृत्यू किरकोळ अशा कारणांमुळे झाल्याने कल्याण तालुका ग्रामीण परिसर हादरला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चारच दिवसांपूर्वी तालुक्यातील मांजर्ली गावातील सुभाष मदन माळी या तरुणाला किरकोळ अशा जुलाब व उलटीचा त्रास होऊ लागल्याने त्याला कल्याण येथील मिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर त्याचा लहान भाऊ पवन माळी याला देखील असाच त्रास होऊ लागल्याने त्यालाही याच रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान सुभाष याचा मृत्यू झाला. तर लगेच दोन तासांनी पवन याचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे ऐन दिवाळीत मांजर्ली गावावर दु खाचा डोंगर कोसळला होता. याच गावातील नारायण तुपे याचा देखील याच कारणानं जीव गेला होता. हे सर्व ताजे असतानाच कांबा पावशेपाडा गावातील कु अजिंक्य गणेश पावशे या ऐन विशीतील तरुणाचा पहाटे मृत्यू झाला. 
अजिंक्य याची पाट दुखत होती. म्हणून त्याला प्रथम खेमाणी येथील त्रिमूर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण त्याची तब्येत अधिक खालावल्याने त्याला कल्याण येथील मिरा हाॅस्पिटल मध्ये भर्ती केले होते. परंतु पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. अजिंक्य हा एकुलता एक मुलगा होता. तर त्याचे वडील हे अंपग आहेत. त्यामुळे परिसरात दु:खाचे वातावरण पसरले आहे. अजिंक्य अंत्यत प्रेमळ व गोड स्वभावाचा असल्याने तो सर्वानाच प्रिय होता. कमी वयात त्याचेवर कुंटूबाची जबाबदारी पडली होती. त्याच्या अशा अचानक जाण्याने कांबा पावशेपाडा गावावर शोककळा आहे. 

सध्या जिवघेण्या व माणूसपण विसरायला लावणा-या कोरोना कोव्हीड १९ हा आजार कल्याण तालुक्यातून जवळपास हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. गणेशोत्सवात झालेली चूक सुधारण्यासाठी प्रशासनाने कठोरपणे निर्णय घेतले. याला नागरिकांनी चांगली साथ दिली. शासनाच्या माझे कुंटूब माझी जबाबदारी या अभियानामुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र नांगरिकाच्या मागणीवरून पुन्हा शासनाने मंदिर व इतर धार्मिक स्थळे उघडली आणि भोळ्या भाबड्या  भक्तांची एकच झुंबड उडाली, जसे काय देव कुठे  पळून चाललेत या भावनेने! त्यामुळे नागरिकांनी बेफिकिर राहू नये. मास्क, सॅनिटायझर आणि सोशलडिस्टींग चे पालन करायलाच हवे. अन्यथा आपण गेल्या ७/ ८महिण्यापासून केलेले प्रयत्न, मेहनत, कष्ट निष्फळ ठरतील याचे भान ठेवून दैनंदिन जीवनात वावरायला हवे. 

No comments:

Post a Comment

भटक्या कुत्र्यांचा तक्रारींना केडिएमसी कडून केराची टोपली !

भटक्या कुत्र्यांचा तक्रारींना केडिएमसी कडून केराची टोपली ! कल्याण, प्रतिनिधी - कल्याण शहरात भटक्या कुत्र्यांचा वावरामुळे सामान्य...