Friday, 6 November 2020

मुरबाड तालुक्यातील मुख्य रस्त्यावरील साफसफाई करण्याचे सभापतींचे आदेश !

मुरबाड तालुक्यातील मुख्य रस्त्यावरील साफसफाई करण्याचे सभापतींचे आदेश !    


मुरबाड, (मंगल डोंगरे) :              
स्वच्छतेची सुरुवात स्वतःच्या गावापासून व स्वतः पासून सूरु करणारे मुरबाड तालुक्याचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी जिल्हा परिषदेचे उपअभियंता यांना पञ लिहून तालूक्यातील मुख्य रस्ते तसेच गाव - पाड्या वरील अंतर्गत रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात गवत व झाडे-झुडपे वाढली आहेत यामुळे वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील असणारे मैल बिगारी जे सध्या शासकीय कार्यालयात आरामाची नोकरी करून पगार घेत आहेत त्यांच्या बिट नुसार नेमणूका करुन त्यांच्याकडून हे काम करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. सभापतींचे आदेश जिल्हा परिषद विभाग किती गांभिर्याने घेऊन रस्ते सफाई चे काम करणार हे पाहणे माञ मुरबाडकर नागरिकांना औस्तुक्याचे  ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !!

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !! पुणे, रवी भिसे : प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांच्या देव गिल प्रोडक्श...