मुरबाड {मंगल डोंगरे} : महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या 12 विधानपरिषद सदस्यांमधे राज्यपाल कोट्यातून आपलीच वर्णी लागावी म्हणून अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काॕंग्रेसचे कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी आज ठाणे जिल्हा काॕंग्रेस कमिटी पर्यावरण विभागाने मुरबाड येथे पञकार परिषद घेऊन केली आहे. अशोकराव मोरे हे संपूर्ण कोकणासह महाराष्ट्र राज्यात गेली चाळीस वर्ष काॕंग्रेस पक्षाचे अत्यंत प्रभावी व निष्ठेने काम करत आहेत. तसेच त्यांचा शहरी व ग्रामीण भागात जनसंपर्कही दांडगा आहे शिवाय रायगड जिल्ह्यातून त्यांनी विधानसभेची निवडणूक सुद्धा लढविली होती. म्हणून अशोकराव मोरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती झाल्यास ते या पदाला योग्य न्याय देऊन जनसामांन्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून निश्चितच न्याय देतील. अशा या सर्व समावेशक नेत्याला काॕंग्रेस पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना योग्य न्याय मिळावा व त्यांची राज्यपाल कोट्यातून वर्णी लावावी अशी मागणी ठाणे जिल्हा काॕंग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रा. नरेश मोरे व त्यांच्या जिल्हा कमिटी सह सर्व तालुका व शहराधक्ष पर्यावरण विभाग यांनी केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !!
प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !! पुणे, रवी भिसे : प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांच्या देव गिल प्रोडक्श...
-
विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम या शाळेस वसई तालुक्यातून प्रथम क्रमांक !! मुख्यम...
-
कडोंमनपा स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर कमावतात महिन्यात पाच लाख रुपये - माहिती अधिकार कार्यकर्ते मेढेकर *** आयुक्तांचे यांच्यावर नाही नि...
-
कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी. कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !! ** स्मृती फा...
No comments:
Post a Comment