Friday, 6 November 2020

रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही – ना. छगन भुजबळ

रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही – ना. छगन भुजबळ


नासिक : राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार होत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही, कुणीही कारवाई पासून वाचणार नाही, असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिला आहे. आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान श्री. भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. 

नागरिकांनी दीपावली आनंदात साजरी करावी, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके वाजवून प्रदूषण होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होऊन श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी यंदा फटाके वाजवण्यावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

हिवाळी अधिवेशनाबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, "नागपूर येथील आमदार निवास येथे कोविड सेंटर सुरू आहे. तसेच कोविड विलागीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागपूरला अधिवेशन नको अशी आमदारांची मागणी आहे. आमदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विरोधी पक्ष नेते व कामकाज सल्लागार समितीचे सदस्य याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतील."

No comments:

Post a Comment

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !!

प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांनी केली करोडों रुपयांची फसवणूक !! पुणे, रवी भिसे : प्रसिद्ध अभिनेते देव गिल यांच्या देव गिल प्रोडक्श...