Monday, 9 November 2020

कल्याण पंचायत समितीला नवी झळाळी !

कल्याण पंचायत समितीला नवी झळाळी !                      
           
कल्याण (संजय कांबळे) : जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातील दुवा तसेच तालुक्याचे विकास केंद्र म्हणून ओळखले जात असलेल्या कल्याण पंचायत समितीचा वनवास संपणार असे दिसू लागले असून या अनोख्या पध्दतीच्या संरक्षणात्म दुरुस्तीमुळे  कल्याण पंचायतला नवी झळाळी प्राप्त होणार आहे,                   
      कल्याण तालक्याचे विकासकेंद्र म्हणून ओळख असलेल्या कल्याण पंचायत समितीच्या इमारतीचे उद्धाटन सन १९६४च्या  आसपास झाले होते,लोडबेंरिंग पध्दतिने बांधलेल्या या इमारतीचा  कालावधी केंव्हाच संपलेला असल्याने ती कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने धोकादायक घोषित केली आहे,या इमारतीमधील, सभापती, उपसभापती, दालन, कृषी, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत, आदी विभाग कार्यालये, बाजूच्याच अल्बचत भवन या इमारतीत हलविण्यात आली,परंतु येथे देखील पावसाळ्यात पाणी गळती, प्लास्टर कोसळने, भिंतीना तडे, आदीमुळे येथील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करित होते,कित्येक वेळा तर थोड्क्यात जीव वाचला,त्यामुळे सर्वच याला वैतागले होते, कधी एखदाची ही इमारत पाडून या जागी नवी उभा राहते असे झाले होते,तसे यावर दुरुस्तीपोटी आता पर्यत लाखोंचा खर्च झाला आहे,                         
        मध्यतरी नवीन इमारत भाड्याने घेण्याचा प्रस्ताव आला, काही ठिकाणी इमारती बघण्यात आल्या पण तेही बारगळले, अखेर लोकप्रतिनीधी व प्रशासन यांच्या प्रयत्नाने सुमारे ८०/८६लाख रुपये पंचायत समितीच्या दुरुस्तीसाठी मंजूर झाल्याने गेल्या  ३/४ महिण्यापासून हे दुरुस्तीचे काम सुरु असून गंजलेले प्लेअर, पाणी गळती, तडे गेलेल्या भिंती, चिरलेले खांब पुर्णपणे नव्याने दुरुस्त करण्यात आले असून जिना छत, गँलरी टेरिस अशी सर्वच दुरुस्ती केली आहे,त्यामुळे आता कल्याण पंचायत समितीने कात टाकली आहे,गेल्या त्यामुळे ४०/५० वर्षापासून वनवास भोगत असलेले कर्मचारी,व नागरीक या संरक्षणात्म दुरुस्तीमुळे सुटणार आहेत.

No comments:

Post a Comment

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न ! **शिबिरात आधारकार्ड नोंदणी व अद्यायावत करण्यासाठी नागरीकांची गर्दी **तसेच ब प्र...