भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश !!
मुरबाड--{मंगल डोंगरे} : भाजपच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील भाजपच्या एकहाती सत्तेला सुरूंग लागला आहे.
मुरबाड तालुका हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. महाराष्ट्रात मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मुरबाडकरांनी भरघोस मतदान करून राज्यात सर्व विजयी उमेदवारांमध्ये तिसऱा क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवून दिला होता. तालुका पंचायत समिती व मुरबाड नगरपंचायत मध्येही भाजपचेच वर्चस्व आहे. तालुक्यात भाजपची एकहाती सत्ता असताना पक्षातील अंतर्गत कलहामुळे भुवन गावातील सुमारे सत्तर भाजप कार्यकर्ते व मुरबाड नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भाजप कार्यकर्ते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व सिडको महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष दशरथ तिवरे, जिल्हा महिला अध्यक्ष विद्याताई वेखंडे, प्रदेश प्रतिनिधी प्रमोद चौधरी, कालीदास देशमुख, तालुका अध्यक्ष राजाभाऊ सासे, शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे इ.मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्यायविभागाचे तालुका अध्यक्ष नामदेव गायकवाड, हरेश पुरोहित, सरनिंगे इ.सह शेकडो राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान मुरबाड शहरात नवरात्रौत्सवात ऑनलाइन वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामधील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
No comments:
Post a Comment