Tuesday, 10 November 2020

एन एस आर एंटरटेनमेंटने ऑनलाईन माध्यमाचा प्रभावी योग्य उपयोग करून अभंग गायन स्पर्धा संपन्न – शाहीर नितीन रसाळ

एन एस आर एंटरटेनमेंटने ऑनलाईन माध्यमाचा प्रभावी योग्य उपयोग करून अभंग गायन स्पर्धा संपन्न – शाहीर नितीन रसाळ


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
              संत परंपरा जपणारा महाराष्ट्र ही जगभरात ओळख आहे ही परंपरा कायम ठेवण्याचे काम एन एस आर एंटरटेनमेंट आयोजित स्वराज निर्मित, शाहीर नितीन रसाळ प्रस्तुत अभंग गायन स्पर्धा २०२० ही ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली. या स्पर्धेत ५८ कलाकारांनी सहभाग घेतला. ऑनलाईन माध्यमाचा प्रभावी उपयोग करून  कोरोनाच्या संकटामध्ये भक्ती मार्गात खंड पडू न देण्याचे काम एन एस आर एंटरटेनमेंटने केले आहे यांची चर्चा सर्वच स्तरावर होत असून या उपक्रमाचे कौतुकच होत आहे.

                 कोरोना सारखी महामारी जगावर आली आणि धार्मिक स्थळे लॉकडाऊन मध्ये बंदच त्याचबरोबर सगळ्याच लोककलाही बंदच पडल्या. चार व्यक्ती एकत्र येता येत नसल्याने भजनाचा वारसा जो आपण हरिनाम सकाळ, संध्याकाळ रेल्वे प्रवासात करत होतो परंतु लोकल बंद असल्याने त्यापासून दुरावल्या अवस्थेत सगळेच विखुरले गेले. ज्या मंडळाच्या स्पर्धा होतात त्यावेळी फक्त एकच मंडळातून एकच गायक गाऊ शकतो परंतु सारासार विचार करता अनेक मंडळात अनेक गायक आहेत परंतु त्यांना कधी व्यासपीठावर स्वतःच कर्तृत्व दाखवता आले नाही म्हणूनच प्रत्येक मंडळातून अनेक गायक रसिकासमोर यावेत हे एक प्रांजळ मत. आणि नव्याने चालू केलेल्या NSR Entertainment या यु ट्यूब चॅनल व्दारे पहिला मान भजनाला मिळावा भजन वारसा चालू रहावा अशी मनोमनी असलेली इच्छा पूर्ण झाली. लोकल प्रवासी भजनी मंडळांकडून मिळाली प्रेरणा तिन्ही लाईन मधील शिखर संस्था म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था (रजि) आणि पश्चिम रेल्वे मधील श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था (रजि) या दोन्ही संस्था मुळे आज लोकल प्रवासी भजनी मंडळे सुरळीत पणे चालू आहेत. आणि त्यामाध्यमातून अनेक मंडळे मंडळाच्या वर्धापनदिन सोहळा साजरा करण्याच्या उद्देशाने भजन स्पर्धा आयोजन करून भजनी मंडळांना व्यासपीठ देत असतात. हीच एक प्रेरणा उराशी बाळगून व्हाँट्सअप, फेसबुक, यु ट्यूब सोशल मीडियाचा प्रभावी वापर योग्य पद्धतीने करता येतो याचा प्रत्यय अनेकांना यावा यासाठी ऑनलाइन भजन स्पर्धा आयोजन नियोजन केले. सर्व स्पर्धकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रथम पारितोषिक -११११/- रुपये व सन्मानपत्र - दर्शन नवाळे बुवा, द्वितीय पारितोषिक - ७०१/- रुपये व सन्मानपत्र- प्रकाश कदम बुवा, तृतीय पारितोषिक - ५०१/- रुपये व सन्मानपत्र - सुधीर आयरे बुवा तसेच उत्तेजनार्थ प्रथम – सन्मानपत्र- अंकुश सावंत बुवा, द्वितीय- सन्मानपत्र - प्रदिप चौगुले, तृतीय – सन्मानपत्र- दिपेश नाईक बुवा, लक्षवेधी गायन - प्रथम- सन्मानपत्र -प्रमोद कुळये- द्वितीय- सन्मानपत्र -दिपक थोरे- लक्षवेधी बालकलाकार प्रथम- सन्मानपत्र- कु. वेद आजविलकर, द्वितीय – सन्मानपत्र- कु. निधी कोरगावकर, तृतीय -सन्मानपत्र- कु. कौस्तुभ सुतार या प्रदान करण्यात आला. या स्पर्धेसाठी परीक्षक आदरणीय गुरुवर्य अरुण  राणे माऊली व आदरणीय गुरुवर्य संतोष तेली  परीक्षक म्हणून लाभले.शेवटच्या क्षणापर्यत सर्व स्पर्धकांनी दाद देऊन स्पर्धा यशस्वी केल्या  यासाठी श्री. कृष्णा सुर्वे, जयराम पवार , जनार्दन धयालकर, आणि वसंत प्रभू माऊलीयांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ग्राफिक्स म्हणून संपूर्ण जबाबदारी संदीप सुतार यांनी पाहिली. अशी प्रथम स्पर्धा नियोजन कार्यक्रम पूर्णत्वास होण्यास मदत झाली असे आयोजक एन एस आर एंटरटेनमेंट चे सर्वेसर्वा प्रस्तुतकर्ता शाहीर नितीन रसाळ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न ! **शिबिरात आधारकार्ड नोंदणी व अद्यायावत करण्यासाठी नागरीकांची गर्दी **तसेच ब प्र...