आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुप मार्फत गरजवंतासाठी राबविण्यात आला "एक हात मदतीचा" उपक्रम !
मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :
हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे ८०% समाजकारण २०% राजकारण हेच उद्दीष्ट समोर ठेवून संतोष पाटील व सुर्यकांत कडू या शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे विचार व शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपरयात पोहचावी या उद्देशाने चालू केलेला व्हाँट्सअप ग्रुप "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या ग्रुप मार्फत गरजवंतासाठी राबविण्यात येणारा उपक्रम "एक हात मदतीचा" या उपक्रमाची पहीलीच मदत कोणासमोरही हात न पसरता आयुष्यभर स्वाभिमानाने जगणारे डोंबिवलीचे जोशी काका यांना रोख रक्कम २१०००/-रु (एकविस हजार) देण्यात आली. यावेळी ग्रुपमधील मार्गदर्शक तसेच ग्राहक संरक्षण कक्ष शाखा संपर्क प्रमुख यशवंत खोपकर, रविंद्र जाधव, दिलीप गावडे, सुरेश कोरगावकर, अनिल कांबळे,बाबु राणे, विनायक जाधव यांच्याहस्ते देण्यात आली. यावेळी इतर शिवसैनिकही उपस्थित होते.
No comments:
Post a Comment