Monday, 16 November 2020

सिद्धकला तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंची ऑनलाइन स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी !

सिद्धकला तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंची ऑनलाइन स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी !


"तनिष्का वेल्हाळ, रेहान वंकावाला, जयवीर कोचर सुवर्ण पदकाचे मानकरी"

मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
          गोवा येथील ल्युईस तायक्वांडो क्लब तर्फे नुकत्याच पार पडलेल्या २०२० खुल्या ऑनलाईन क्लब रेकगनाइज पुमसे, बीच पुमसे, स्पीड किक्कींग तायक्वांडो स्पर्धेमध्ये मुंबईतील सिद्धकला तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता, तसेच भारताच्या विविध राज्यातील पंचांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून विविध राज्याच्या खेळाडूंनी विविध वयोगटात सहभाग घेतला होता. तसेच सिद्धकला तायक्वांडो अकादमीचे संघ प्रमुख आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक मास्टर जयेश वेल्हाळ यांच्या अधिपत्याखालील मुख्य प्रशिक्षक निशांत शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे मुलांनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत पदक कमावले. सुवर्ण पदक विजेते खेळाडू तनिष्का वेल्हाळ - यु/११ ब्लॅक बेल्ट फिमेल, रेहान वंकावाला - केडेट ब्लॅक बेल्ट मेल , जयवीर कोचर - यु/१४ कलर बेल्ट मेल. रजत पदक विजेते खेळाडू अर्नव अत्रे - केडेट ब्लॅक बेल्ट मेल, अंगद नाडकर्णी - यु/११ कलर बेल्ट मेल, हरमन सुरी- यु/१४ कलर बेल्ट मेल, अमायरा पेंटर- यु/११ कलर बेल्ट फिमेल. कांस्य पदक विजेते खेळाडू फिया इनामदार - केडेट ब्लॅक बेल्ट फिमेल, तियारा बत्रा- यु/११ कलर बेल्ट फिमेल, क्रिश शहा - यु/१४ कलर बेल्ट मेल, जयेश वेल्हाळ यांनी सर्व पदक विजेत्यांचे, पालकांचे आणि सर्व प्रशिकाचे अभिनंदन केले. महिना भराच्या आतच झालेल्या दोन्ही स्पर्धा मध्ये सिद्धकला अकादमीने उत्तम कामगिरी केली. जयेश वेल्हाळ यांनी इंडिया तायक्वांडोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर व गोवाच्या अँजेला  यांचे आभार मानले की त्यांनी या करोना काळात मुलांना संधी उपलब्ध करून दिली.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...