वाघाची वाडी मढ येथे महिला साक्षरतेचा उपक्रम !
कल्याण (संजय कांबळे) : काही दिवसांपूर्वी पंधराशे रुपये चे अज्ञान, एक महिला व दोन मुलांमधील विडिओ सोशलमिडयावर व्हायरल झाला होता. यातून आजही समाजामध्ये विशेष करून महिलांमध्ये किती निरक्षरता /अज्ञान आहे हे समोर आले होते. त्यामुळे हे लक्षात घेऊन 'अंगठा मी नाही देणार, सही मी करणार ही नाविन्यपूर्ण संकल्पनेतून वाघाची वाडी (मढ) येथील महिलांना साक्षरतेचा धडा गिरवण्यात आला.
मुरबाड तालुक्यातील वाघाचीवाडी (मढ) येथे *"अंगठा मी नाही देणार, सही मी करणार"* या नाविन्यपूर्ण महिला साक्षरतेचा साईनाथ बोंबे सामाजिक कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतुन व जयवंत सावळा प्राथमिक शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उपक्रमातंर्गत छोटेखानी सभा आयोजित केली होती.
सभेस मढ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व साक्षरता उपक्रमातील माताभगिनी उपस्थित होत्या.
या नाविन्यपूर्ण उपक्रमातुन महिलांना बँक व्यवहार , आपल्या मुलांचे शिक्षण , सरकारी लाभाच्या योजना , आरोग्य शिक्षण, एकीची भावना, आपल्या कुटुंबाचे व्यवस्थापन, मतदानाचा अधिकार, बचत गटांचा आर्थिक व्यवहार, सामाजिक जणिव, अंधश्रद्धा निर्मुलन व महत्वाचे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे , असा हा अत्यंत स्तुत्य, प्रेरणादायी व परिसराला अनुकरनिय उपक्रम दिसुन आला.
या उपक्रमाचे संयोजक साईनाथ बोंबे व जयवंत सावळा गुरुजी यांचे विशेष अभिनंदन व या उपक्रमात साक्षर होण्यासाठी उस्फूर्त सहभागी माताभगिनींचे अभिनंदन व या नाविन्यपूर्ण उपक्रमास मनापासून शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षण समितीचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत आणि सोनावळे चे केंद्रप्रमुख उल्हास घोलप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment