भांबेडमधील लांबोरे कुटुंबाला समीर खाडिलकर यांचा मदतीचा हात !
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड येथील दारीद्ररेषेखाली जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष संजय लांबोरे यांचे दि. २९ ऑक्टोबर सर्पदंशाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात कुटूंबात वयस्कर वडील, पत्नी व दोन लहान मुले आहेत. घरातील एकमेव कमावत्या पुरषाचे अचानक निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कै. संजय लांबोरे यांचे साधे कच्चे घर असून सध्या हे घर कुटूंबाला राहण्यासाठी धोकादायक आहे. कुटूंबाचा कर्ता अचानक निघून गेल्याने व राहाण्यासही योग्य निवारा नसल्याने तसेच घरी अन्नधान्याची टंचाई असल्याने अनेक संकटांचा सामना करत कै. संजय लांबोरे यांचे कुटुंब जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. कै. संजय लांबोरे यांच्या संकटग्रस्त कुटूंबाला आधाराची आवश्यकता आहे अशी माहीती मिळताच समाजसेवक व महाराष्ट्र हरित सेना वन विभाग (महाराष्ट्र शासन)चे सदस्य समीर खाडिलकर यांनी खारीचा वाटा उचलत आर्थिक मदतीचा हात दिला. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने समीर खाडिलकर यांनी लाँकडाऊन काळावधीत अनेक कुटूंबांना अन्नधान्य वाटप तसेच जेष्ठ नागरिक/पत्रकार, गरजवंत कुटूंब यांना अन्नधान्य वाटप केलेले आहे. अनेक संस्था, मंडळ व प्रसिद्धी माध्यम यांनी समीर खाडिलकर यांना "कोरोना योध्दा" सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे. सतत गरजवंतांच्या मदतीला धावणे हा त्यांचा ध्यास आहे. सर्वांनी थोडाफार मदतीचा हातभार लावल्यास कै. संजय लांबोरे यांच्या कुटूंबाला आधार देऊन त्यांना आपण आनंद देऊ शकतो, अशी भावना समीर खाडिलकर यांनी व्यक्त करत होईल ती मदत यापुढेही आपण करु असे आश्वासनही दिले. समीर खाडिलकर यांनी केलेल्या मदतीबद्दल लांबोरे कुटूंबीयांसह स्थानिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment