अखेर स्वराज्य भातपिक संघटनेच्या लढ्याला यश !! *मुरबाड तहसीलदार आणि खरेदी विक्री संघ शेकऱ्यांचे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील*
मुरबाड :-- {मंगल डोंगरे } : कोविड 19 च्या लाँकडाऊन मुळे व अवकाळी पावसाने बळीराजाला अक्षरशः पिळून काढले असतानाच या मध्येच वेळेत पंचनामे न करणे, कर्ज माफी न होणे, अव्वाच्या सव्वा भावाने बी बियाणे, खताची विक्री याने शेतकरी मेटाकुटीस आला असताना, शासनाने काढलेला भात खरेदी केंद्र सुरू करावी या संदर्भात 27 फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याने तो आदेश आमलात आणणेसाठी दि. 2 नोव्हेंबर रोजी स्वराज भातापिक संघटनेचे अध्यक्ष रमेश हिंदुराव, उपाध्यक्ष दत्तात्रय पतंगराव, बाळु हरड, विष्णु चौधरी रमेश गायकवाड यांचेसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. या उपोषणाला हजारो शेतकऱ्यांनी पांठिबा दर्शविल्याने तहसीलदार अमोल कदम व तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश पवार यांनी शेतकऱ्यांचे हिताचा विचार करुन त्याची अमलबजावणी करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
मुरबाड तहसिलदार कार्यालया समोर होत असलेल्या या उपोषणात शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा बाजी करत शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला .या वेळी खरेदी विक्री संघात सीसीटीव्ही कॅमेरे, शेतकऱ्यांना प्रती क्विंटल चार हजार हमीभाव, त्वरित भातखरेदी केंद्र चालू अशा विविध मागण्या घेऊन उपोष्ण सुरू असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. अखेर खरेदी विक्री संघाने आपल्या स्तरावर असणाऱ्या मागण्याची तातडीने अमलबजावणी केली जाईल व काही वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविल्या जातील असे लेखी आश्वासन देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
No comments:
Post a Comment