कल्याण (संजय कांबळे) : नांगरिकांचाआणि वाहन चांलकांचा प्रवास सुरक्षित, जलद आणि सुखकर व्हावा या हेतूने राज्यात उड्डाण पुल व रस्ते बांधले, खरे पण यावर टोल बसवले, मात्र त्या बदल्यात सर्वसामान्य लोकांना मिळाले काय तर तुटकी फुटकी शौचालये,मोठ मोठे खड्डे, पाण्याचा अभाव, वाहतूक कोंडी व कर्मचा-याची दादागिरी त्यामुळे पुन्हा एकदा लोकांना मनसे च्या 'खळ खट्ट्याक' अंदोलनाची गरज वाटू लागली आहे,
काही वर्षापूर्वी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात टोळ धाड निर्माण झाली होती, ५/१० किमी अंतरावर टोल नाके निर्माण झाले होते, औरगजेंबाच्या काळात ज्या प्रमाणे जिझीया कर वसूल केला जात होता, त्याप्रमाणे जबरदस्तीने टोल वसूल केला जात होता, टोल देण्यास नकार दिला किंवा सुट्टे पैसे, फाटक्या नोटा, या किंवा या सारख्या किरकोळ कारणावरुन टोलनाक्यावरील कर्मचारी सामुहिकरित्या वाहनचालक किंवा नांगरिकाना जबर मारहान करित होते. अशा घटना सर्वच टोल नाक्यावर घडत होत्या. वाहनचालकासह नागरिकांमध्ये कमालीचा संताप या टोल नाक्यांविरोधात निर्म!ण झाला होता, नेमका याच वेळी महाराष्ट नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा विषय उचलला, राज्यत सर्वच टोल बुथवर मनसेने खळ खट्यक, अंदोलन केले, याचा परिणाम महाराष्टत अनेक टोलनाके बंद झाले, तसेच टोल नाका परिसरात शौचालय, पिण्यचे पाणी, आरामकक्ष, अशा सुविधा झाल्य होत्या पण नंतर पुन्हा ! जेसे थे सुरु झाले, महाराष्ट्र नँशनल हायवे आफ इंडिया, आय आर बी, एम एस आर डी सी यांचे टोल नाके आहेत, मुंबई नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर या रस्त्यावर अनेक टोल नाके आहेत पण येथे सोईसुविधाची पुरती बोंबाबोब आहे, शौचालयाचा अभाव, असलीच तर तूटलेले दरवाजे, कोरडे नळ, जागेचा अभाव, अशा अनेक अडचणी असून अगोदर वाहतूक कोंडी होत असताना आता टोल नाकेवर फास्ट ट्रग तयार करण्यत आले आहेत, चुकून जर एखादी गाडी या ट्रकवर आली तर वाहन चालकाकडून डब्बल टोल वसूल केला जातो, यामुळे वाहन चालक व टोल कर्मचारी याच्यत खटके उडत आहेत, यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहेत,त्यमुळे आता परत मनसे च्य खळ खट्याक अंदोलनाची गरज नांगरिकांना वाटू लागली आहे.
No comments:
Post a Comment