Sunday, 1 November 2020

सरदार वल्लभाई पटेल व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी वाहिली आदरांजली !

सरदार वल्लभाई पटेल व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी वाहिली आदरांजली !
 
   
      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : सरदार वल्लभाई पटेल  व महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली व राष्ट्रीय संकल्प व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थितांना शपथ दिली.
       यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.मधुकर बोडके, तहसिलदार सतिष कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं."-- ह भ प चारुदत्त आफळे    कल्याण, अतुल फडके :     आज उच्च शि...