नवी मुंबई महानगरपालिकेत उद्यान घोटाळा संदर्भात कारवाई !
नवी मुंबई, प्रतिनिधी : उद्यान देखभाल दुरुस्तीच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ठेकेदारांनी अनेक ठिकाणची कामेच केली नाहीत, तर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही देयके न तपासताच मंजूर केली आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी दोन ठेकेदारांसह उद्यान विभागातील उपायुक्तासह १४ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. कामे न करताच देयके लाटल्याचे चौकशीत समोर आले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात वंडर्स पार्क, रॉक गार्डन यासह २८० उद्याने आहेत. या उद्यानांची यापूर्वी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांमार्फत विभागानुसार देखभाल केली जात होती. मात्र गेल्या वर्षी ही परंपरागत ठेकेदारी पद्धत रद्द करीत परिमंडळ १ व परिमंडळ २ अशी विभागणी करीत फक्त दोनच ठेकेदारांनी ही कामे देण्यात आली होती. १ मेपासून ही कामे देण्यात आली होती, मात्र करोनाच्या काळात उद्यानांची देखभाल दुरुस्तीकडे ठेकेदारांनी दुर्लक्ष केले. कामाची देयके मात्र घेतली, यावर लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे पालिका आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली होती. ३६० ठिकाणांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून दोन कार्यकारी अभियंत्यांनी पालिका आयुक्तांना अहवाल सादर केला आहे.
No comments:
Post a Comment