Sunday, 8 November 2020

नालासोपारा येथे केबल व्यावसायिक सचिन नाईक यांची निर्घुण हत्या !

नालासोपारा येथे केबल व्यावसायिक सचिन नाईक यांची निर्घुण हत्या !
वसई, प्रतिनिधी : नालासोपारा पूर्व येथील वाघोली गावात धारधार शस्त्राने एका केबल व्यावसायिकाची रविवारी क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात नालासोपारा पोलीस घटनास्थळी पंचनामा करून हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सचिन नाईक (वय-४०) असे या केबल व्यावसायिकाचे नाव असून तो स्थानिक ग्रामस्थ आहे.

हत्येमागचे  नेमके कारण कळले नसले तरी पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीने नाईक यांच्यावर एका केळीच्या बागेत कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली.

No comments:

Post a Comment

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न ! **शिबिरात आधारकार्ड नोंदणी व अद्यायावत करण्यासाठी नागरीकांची गर्दी **तसेच ब प्र...