Friday, 6 November 2020

आय ए एस,आयपीएस, सिनेकलावंत यांचे 'कोरोना वारिर्यस' म्हणून मोठे योगदान !

आय ए एस,आयपीएस, सिनेकलावंत यांचे 'कोरोना वारिर्यस' म्हणून मोठे योगदान !                                


कल्याण (संजय कांबळे) : काही लोकांना काम कमी आणि प्रसिध्दी अधिक करण्याचा मोह अनावर होतो,तर दुसरीकडे सामाजिक कार्य अतूलनिय करुनही प्रसिध्दि पासून कोसो दूर राहतात,कारण त्यांचे एकच म्हणने असते,आपत्तीच्या किंवा संकटकाळात मदत महत्वाची ! नेमके असेच काम, 'कोरोना वारिर्यस'हे काम करीत असून यामध्ये राज्यातील अनेक आय ऐ एस,आय पीएस असे अतिउच्च अधिकारी,डाँक्टर मंडळी आणि सिनेकलावंत यांचा सहभाग असून यांचे कोरोना काळातील काम नक्कीच कौतूकास्पद आहे,                           
 
  देशासह राज्यावर अचानक कोरोना महामारीचे संकट कोसळले,याच काळात राज्यात सत्तेचे' मानापमान'नाटक घडले,कोणताही प्रशासकीय अनूभव नसलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून आघाडी सत्तेत आली,आणि अशा दोलायमान परिस्थितीत कोरोनाने राज्यावर घाला घातला, संचारबंदी, जमावबंदी, आणि लाँकडाऊन असे अप्रिय निर्णय सरकारला घ्यावे लागले,यावेळी प्रशासन म्हणून मंत्र्यांचे सचिव, जिल्हाधिकारी, यांची मोठी जबाबदारी होती, कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत होते, विरोधक टिकेची एकही संधी सोडत नव्हते, अशा बिकट परिस्थितीत अंत्यत संयमाने नियोजन केले, अगदी गावखेड्यापासून ते मोठमोठ्या शहरापर्यत अंगणवाडी, सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी, सीईओ,आणि सचिव यांच्या सर्वाच्या योग्य नियोजन,अचूक टाईम,कडक अंमलबजावणी, या त्रिसूत्रीच्या जोरावर आज राज्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे. असे म्हणायला हरकत नाही, अशातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी आणलेलीv"माझे कुंटूब माझी जबाबदारी" ही संकल्पना /योजना खूपच प्रभावी ठरली, हे सर्व शक्य झाले ते सरकारच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले ते म्हणजे अनेक 'कोरोना वारिर्यस' यामध्ये मंत्र्यांचे सचीव, जिल्हाधिकारी, अनेक सिनेकलावंताचा समावेश होता, प्रामुख्याने ठाण्याच्या माझी जिल्हाधिकारी अश्विनी भिडे, डाँ गौतम भन्साळी, डाँ स्वप्ना पाटेकर, डाँ गिता वाशी, डाँ उज्वला ओतूरकर, डाँ ज्ञानेश्वर शेळके, कु प्रिया मोहन, डाँ स्मिता चव्हाण, डाँ गुरुनाथ खान, जेष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, अवधूत राणे, हेंमत नागरेकर, कु प्रिया मोहन, यांचा सहभाग असून या सर्वांनी, शासनाच्या बरोबरीने कोरोना संकटात आर्थिक, सामाजिक, शारिरीक, शैक्षणीक, सांकृतीक, मदत केली, यांचा परिणाम म्हणून कोरोना रुग्णांची संख्या खाली आली आहे, तर मृत्यूदर कमालीचा घटला आहे,          दरम्यान जाणकार आणि तज्ञांच्या मतानुसार आता थंडीचे दिवस सुरु होत आहेत,हे वातावरण कोरोना कोव्हिड विषाणू साठी पोषक मानले जाते,त्यामुळे दर्लक्ष करुन चालणार नाही, मास्क, सँनिटायझर आणि सुरक्षित अंतर यांचे पालन केलेच पाहिजे,तरच आपल्या सर्वच कोरोना वारिर्यस यांनी सुरु केलेली लढाई आपण जिंकू याचा विचार सर्वानीच करायला हवा, कारण मला माहिती आहे,माझे कुंटूब ही माझी जबाबदारी आहे.

No comments:

Post a Comment

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून आधारकार्ड नोंदणी शिबीर संपन्न ! **शिबिरात आधारकार्ड नोंदणी व अद्यायावत करण्यासाठी नागरीकांची गर्दी **तसेच ब प्र...