ट्रेकर्स असोशियशनचा गोरखगडावरील तिसऱ्या वर्षीचा दिपोत्सव उत्साहात साजरा ! **एक पहाट गोरखगडावर **
मुरबाड (श्री. मंगल डोंगरे) :
शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२० रोजी सालाबादप्रमाणे लक्ष्मीपुजनाच्या दिवशी पहाटे गोरखगडावर ठाणे जिल्हा ट्रेकर्स असोशियेशन आयोजित “ एक पहाट गोरखगडावर...” दिपोत्सव तिसऱ्या वर्षीही उत्साहात कोरोनाचे प्रतिबंधित नियम पाळुन साजरा करण्यात आला. ह्यावर्षी पहिल्यांदा दिवाळी संध्या कार्यक्रमा अंतर्गत नव्या पिढीचे गायक रायगडरत्न संजय पाटील बुवा (शिवाजीनगर) व संच यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम गोरखनाथ मंदीर, देहरी परिसर येथे आयोजन करण्यात आले होता. सदरील कार्यक्रमास ट्रेकर्स असोशियेशनचे अध्यक्ष चेतनसिंह पवार व मठाधिपती प.पु. धिरजनाथ महाराज तसेच कल्पेश कोरडे, सदाशिव चिराटे आदी मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
गोरखगडावर दिपोत्सवासाठी सर्व ट्रेकर्संनी मध्यरात्री १२:०० ला प्रस्थान केले व गोरखगडावरील मुख्य मंदीर व मंडप येथे पहाटे ४:०० वाजता दिप प्रज्वलित करुन प्रचंड उत्साहात दिपोस्तव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल चिराटे, विनोद आगाणे, गुरूनाथ पष्टे, तानाजी पष्टे आदींनी प्रचंड मेहनत घेतली. ट्रेकिंगच्या माध्यमातुन मुरबाड तालुक्यामध्ये रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी त्यामाध्यमातुन स्थानिकांना उत्पन्न सुरू व्हावे म्हणुन सदरचा उपक्रम सुरू केल्याचे चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन केले.
No comments:
Post a Comment