कल्याण तालुक्यातील 'बापसई' ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातून निवड, पन्नास लाखांचा निधी, कल्याणकरांची दिवाळी गोड !!
कल्याण (संजय कांबळे) : गाव करी तो राव काय करी, अशी म्हण आहे, हिच म्हण प्रत्यक्षात उतरवली आहे ती तालुक्यातील नवगाव बापसई गावातील ग्रामस्थांनी !यांच्या सर्वाच्या कष्टाचे फळ म्हणजे, बापसई ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातून एकमेव निवड झाली असून येथील विकास कामांना बक्षीस रुपी तब्बल ५० लाखांचा भरघोस असा निधी मिळणार आहे. ही बातमी ऐन दिवाळीच्या सुरुवातीला समजल्याने कल्याणकरांची दिवाळी गोड होणार आहे.
कल्याण तालुक्यातील बापसई नवगाव हे गाव तसे पूर्वी पासून परिचित आहे. ते येथे पोलीस दुरक्षेत्र असल्याने, याची साक्ष देणारी पोलीस चौकी अद्याप येथे आहे. तसे पाहिले तर हे गाव तसे शेतीप्रधान ! पण येथेही राजकारण घुसले व वाट लागली, गावातील. वादामुळे अनेक शासकीय योजना परत गेल्या होत्या, पण देर आये याप्रमाणे गावातील जाणकार मंडळी, महिला बचतगट, तरुण मंडळी आणि पुढाकार घेऊन गावाच्या सर्वागीण विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाच्या उत्तम समन्वयाच्या आधारावर गावाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळे गावात पाणी पुरवठा, रस्ते, गटारे, शौचालय, आरोग्य, शिक्षण, आदी सोईसुविधा निर्माण केल्या कृषी विभागाचे विभागाचे विविध जिल्हास्तरीय मेळावे येथे आयोजित केले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना माहिती, मदत मिळाली
बापसई ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती आशाबाई अशोक टेंभे, उपसरपंच अंनता टेंभे, सदस्य सुखदेव टेंभे , राजाराम फसाळे, श्रीमती अरुणा टेंभे, निकिता गायकवाड, शोभा टेंभे आणि ग्रामसेवक बाळू कोकणे यांनी गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय घेतला. याला पंचायत समिती स्तरावरून माझी सभापती भारती रविंद टेंभे यांनी मोलाची साथ दिली. ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्लास्टिक बंदी, हागणदारी मुक्त गाव, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक इमारतीमध्ये शौचालय सुविधा, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, स्वच्छ पाणी पुरवठा, गाव सॅनिटायझर, ग्रामसभेचे आयोजन, जलसंधारणची कामे, वृक्षलागवड, विविध प्रकारच्या शासकीय व केंद्रीय योजनांमध्ये सक्रिय सहभाग, ग्रामपंचायत रेकॉर्ड संगणकीकरण, सौरदिवे, लेखापरीक्षण पुर्तता, १०/१५ टक्के खर्च, कुंटूब आधार कार्ड, योजनांची अंमलबजावणी यामध्ये ग्रामस्थ, बचतगट, तरुण तरुणी, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या सह विस्तार अधिकारी, कक्ष अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या मदतीने व समन्वय साधून ग्रामसेवक बाळू कोकणे यांनी गावात काम केले याचा परिणाम म्हणून तालुक्यातील बापसई ग्रामपंचायतीची जिल्ह्यातून स्मार्ट ग्राम स्पर्धेत निवड झाली.
ग्रामीण भागाचा विकास व्हावा त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून स्मार्ट ग्राम ही संकल्पना पुढे आली. मागील वर्षी कोकणे ग्रामसेवक असलेल्या जांभूळ ग्रामपंचायतीचे बक्षीस एक दोन मार्कासाठी हुकले होते. ते मुरबाड तालुक्याला देण्यात आले होते. बापसई ग्रामपंचायतीचे मुल्यांकण करण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील टिम आली होती. जिल्हातील पाच पंचायतीमधून एक ग्रामपंचायत स्मार्ट ग्राम म्हणून निवडायची होती. त्यामुळे जिल्ह्य़ातील टिम देखील बापसई येथे येऊन पाहणी करून गेली होती. अखेरीस सन २०१८/१९ या वर्षांचा स्मार्ट ग्राम पुरस्कार तालुक्यातील बापसई ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे यामुळे ग्रामपंचायतीला सुमारे ५० लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी कल्याण तालुक्यासाठी नक्कीच गोड ठरली आहे या संदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांना विचारले असता ते म्हणाले, हे यश बापसई ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, बचतगट, ग्रामसेवक कोकणे, ग्रामस्थ तसेच आमचे विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांचे आहे असे ते म्हणाले तर बापसई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बाळू कोकणे यांना विचारले असता ते म्हणाले हे सर्व माझ्या ग्रामपंचायत कमिटीचे, आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थांचे यश असून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे.
ऐन दिवाळीत कल्याण तालुक्यातील बापसई गावाला मिळालेल्या या यशाबद्दल आमदार किसन कथोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ रुपाली सातपुते, उपमुख्यकार्यकारी, कल्याण पंचायत समिती चे सभापती, उपसभापती, सदस्य, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, विस्तार अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन चे कल्याण शाखा अध्यक्ष बाळा गायकर, सर्व सदस्य तसेच जनाधार निर्भीड पत्रकार सेवा संस्था चे अध्यक्ष संजय कांबळे यांनी बापसई ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment