पालिका अधिकारी यांनी विकास कामे न केल्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसरात एक दिन गुजारो - "मंत्रालय समोर प्रहार करणार आंदोलन"
कल्याण : वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसर कचोरे येते तक्रार करून देखील 15 वर्षा पासून विकास काम न झाल्यास मुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी याच्यावर कारवाईची मागणी प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू याच्या कडे करण्यात आली आहे. लवकरच राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू 15 वर्षा पासून महानगर पालिकेने पुनर्वसन केलेल्या परिसराला विकास निधी का उपलब्ध करण्यात आला नाही किंवा विकास कामे का नाही झाली यासाठी क.डो.म.पा मा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी याच्या कडे चोकशी करून दोषी अधिकारी याच्यावर कारवाई करणार असे सागितले लवकरच पालिका प्रशासन वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसरातील सर्व काम आठवड्याच्या आत सुरू करणार अन्यता पालिका अधिकारी याच्यावर कारवाई करण्यात येईल.
२००५ मध्ये गोविंदवाडी रस्ता रुंदी करणात आपले हक्काचे रूम विकास कामा साठी निष्काशीत करून महानगर पालिकेला सहकार्य करणाऱ्या संदनिका धारकांना गेल्या १५ वर्षा पासून रस्ते ,ड्रेनेज, गटार, पथदिवे अश्या विकास कामा पासून जर पालिका अधिकारी वंचित ठेवत असतील तर अश्या अधिकारी यांना कडू डोस दिल्या शिवाय प्रहार शांत बसणार नाही असे प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक अंबादास भालेराव यांनी सागितले आहे. आठवड्याच्या आत पालिकेने वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसरात विकास काम सुरू न केल्यास प्रहार जनशक्ती पक्ष कल्याण तालुका समिती मंत्रालय भवना बाहेर वाल्मिकी आंबेकडर आवास योजना परिसर कचोरे येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी एक दिवस रस्ते नाले ड्रेनेज शोचालाय याचा लाभ घ्यावा हे आंदोलन करणार जेणे करून 15 वर्षात वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसरामध्ये पालिका प्रशासनाने कोण कोणती सुविधा उपलब्ध करून दिली याची जाणीव होईल व नागरिक कोणत्या परस्थिती राहतात हे किमान निदर्शनास येईल यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी एक दिवस विश्रांती करावी वाल्मिकी आंबेडकर आवास योजना कचोरे परिसरात हा आंदोलन करणार असे कल्याण तालुका संघटक अंबादास भालेराव यांनी सांगितले. 3 मार्च 2019 मध्ये पालिकेच्या निष्काळजी पणा मुळे त्या परिसरात सार्वजनिक शोचालयात ड्रेनेज लाईन साफ न केल्यामुळे ब्लास्ट सुद्धा झाला होता त्या ब्लास्ट मध्ये दोन मुली गंभीर जखमी झाले होते तरी पालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाही ही शोकांतिका आहे. गटार नाले रस्ते दुरुस्त न केल्यामुळे अनेक लोकांना घाणी मध्ये आपलं जीवन जगावे लागणार आहे. त्यामुळे असे जीवन सार्वजनिक बांधकाम मंत्री जगू शकतील का? त्यासाठी एक दिवस त्यांनी त्या परिसरात जगावे जेणे करून पालिका प्रशासन अधिकारी किती दुर्लक्ष करून लोकांच्या जीवनाशी खेळत असतात ह्याची जाणीव होईल यासाठी प्रहार लवकरच मंत्रालय समोर आंदोलन करणार आहे असे भालेराव यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment