पत्रकार सुरक्षा समितीच्या मुरबाड तालुका अध्यक्ष पदी पत्रकार मंगल डोंगरे यांची निवड !!
मुरबाड, प्रतिनिधी : मुरबाड तालुक्यात गेल्या दोन दशकां पासून पत्रकारिता क्षेत्रात विविध वर्तमान पत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटविणारे व ज्यांना आता पर्यंत अनेक क्षेत्रातील आदर्श पत्रकार व आदर्श समाज सेवक म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असे मुरबाड तालुक्यातील एक आगळंवेगळं व्यक्ती मत्व असलेले आणि अनेक सामाजिक क्षेत्रातील जबाबदारी पार पाडलेले आदर्श पत्रकार श्री. मंगलजी डोंगरे यांची आज पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकार सुरक्षा समिती मुरबाड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा कार्यकारीणीची सर्वसाधारण सभा आज समितीच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालय बदलापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत अन्य विषयावर चर्चा झाल्यावर उल्हासनगर तालुका व शहर कार्यकारिणीच्या वार्षिक अहवाला बाबत चर्चा करून सदर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. व लगेचच थोड्या वेळाने उल्हासनगर तालुका अध्यक्षपदी रामेश्वर भगवान गवई यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर मूरबाड तालुका अध्यक्षपदी झुंजार पत्रकार मंगलजी डोंगरे यांची निवड घोषित करण्यात आली. याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. अरुणजी ठोंबरे व जिल्हा सरचिटणीस प्रदीपजी रोकडे यांनी तात्काळ नियुक्ती पत्र देवुन मंगल डोंगरे यांना पुढील वाटचाळीस सदिच्छा व्यक्त करुन आठ दिवसात तालुका कार्यकारिणी नेमण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे 'जिल्हा सरचिटणीस प्रदीप जी रोकडे 'रामेश्वर गवई' 'कैलास जाधव' 'ऋतीकेश रोकडे' 'गौतम वाघ' 'रमेश कांबळे' 'विजयसिंह' 'मंगल डोंगरे' यांसह बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

No comments:
Post a Comment