मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडिला अपघात, दोघे जागीच ठार ?
कल्याण (संजय कांबळे) : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडिला रायते येथील वैष्णवी देवी मंदिर जवळ अपघात झाला असून या अपघातात दोन मोटारसायकल स्वार मुलगा व मुलगी जागीच ठार झाले आहेत. सदरचा अपघात आज सायंकाळी सहा ते सात च्या दरम्यान घडला.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा तालुक्यातील म्हसकळ येथे आयोजित केला होता. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर ते बदलापूर येथे निघाले असताना. दहागाव रस्त्यानं रायते गावाच्या दिशेने येत असताना वैष्णवी मंदिराच्या थोडे पुढे मोटारसायकल ने येणाऱ्या साधारण पणे 20/22 वर्षाचा मुलगा व 18/20 मुलगी यांच्या गाडिला आमदार किसन कथोरे यांच्या गाडिला जोरदार धडक बसली. यामध्ये हे दोघं जागीच ठार झाले हे दोघही गोळवली पिसवली येथे राहणारे असून त्यांचे आडनाव सिंग असल्याचे समजते. दरम्यान आमदार थोडक्यात बचावले. या दोघांचे आईवडील व इतर 30/40 कार्यकर्ते गोवेली ग्रामीण रुग्णालयात आले असून आईवडिलांनी हंबरडा फोडला आहे. या अपघाताची परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात गोवेली पोलीसांना विचारले असता अपघात झाला आहे ऐवढे सांगण्यात आले.
तसेच आमदार घरी सुखरूप पोहचले असल्याचे एका भाजपाच्या मोठ्या कार्यकर्त्यांनी सांगितले.



No comments:
Post a Comment