संतोष हिरवे यांची बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड !
बोरघर / माणगाव (विश्वास गायकवाड) : शिव, फुले, शाहु, आंबेडकर विचार धारेवर आधारित बहुजन चळवळीच्या प्रत्येक आंदोलनात अग्रेसर आणि सक्रिय खंदे कार्यकर्ते मुरुड-वाणदे पारगाण येथील निर्भीड पत्रकार संतोष जनार्दन हिरवे यांची बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
सामाजिक, राजकीय क्षेत्रात संतोष हिरवे यांचा आगळावेगळा ठसा असून त्यांनी बामसेफ, संभाजी ब्रिगेड, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये उत्तम प्रकारे काम करुन योगदान दिले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.डाॅ.सुरेश माने यांनी दखल घेऊन मुंबई येथील आयोजित सभेत संतोष हिरवे यांची बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे.सर्व उपस्थितांनी संतोष हिरवे यांच्या निवडीचे स्वागत करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.डाॅ.सुरेश माने, महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश बनसोडे, दिपक चौगुले,जितेश निकाळजे, मयूर आठवडे, प्रभाकर जाधव यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment