Thursday, 17 December 2020

नागरिकांनो सावधान *कामे न करताच अधिकाऱ्यांचे संगनमताने ठेकेदार काढतात बिले* सा.बां.विभागातील सुत्रांची माहिती.

नागरिकांनो सावधान *कामे न करताच अधिकाऱ्यांचे संगनमताने ठेकेदार काढतात बिले* सा.बां.विभागातील सुत्रांची माहिती.


मुरबाड (मंगल डोंगरे ) : ग्रामिण भागातील नागरिकांना मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजुर केली जातात. मात्र लाॅकडाऊन च्या काळात ती कामे न करताच अधिकाऱ्यांचे संगनमताने ठेकेदाराने बिले काढुन नागरिकांना समस्यांच्या विळख्यात ठेवल्याचा प्रताप सार्वजनिक बांधकाम विभागात घडल्याचे समोर आल्याने बांधकाम विभागाचे कार्यालयात खळबळ माजली आहे. 
        कोरोना या महामारीवर मात करण्यासाठी मार्च मध्ये शासनाने लाॅकडाऊन सुरु करुन शासकीय कार्यालयात केवळ पाच टक्के अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थित राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी व दळणवळणासाठी  महत्त्वाचे असलेले मंजूर रस्ते हे कोरोनामुळे कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे ते प्रलंबित राहिले. नागरिक समस्यांच्या विळख्यात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या या समस्यांचा विचार न करता अधिकारी व ठेकेदाराचे संगनमताने ते रस्ते डोंगरी विकास योजनेअंतर्गत पुर्ण झाल्याचे दाखवत लाखो रुपयांची बिले काढल्याची माहिती कार्यालयातील एका अभियंत्या कडुन प्राप्त झाली. शिवाय ती कामे ज्या अभियंत्यांचे हद्दित होती ते क्वांरटाईन होते. त्यामुळे त्या कामाचे मोजणी पुस्तक नोंदणी करण्यासाठी देखील दुसऱ्या अभियंत्यावर अधिकाऱ्यांनी दबाव टाकुनी ती बिले काढुन नागरिकांना समस्यां मध्ये ठेवुन शासनाचे तिजोरीवर डल्ला मारला असला तरी तालुक्यातील एकही समाज सेवकाने प्रसार माध्यमांनी किंवा विरोधी पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचे झालेल्या अनियमिततेचा अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत दाखवली नसल्यामुळे तालुक्यातील नागरिक या अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असल्याची खंत त्या अभियंत्याने व्यक्त केली.

             **दहा लाखा पर्यंत चे कामे हि उपविभागाचे अधिकाराखाली येत असतात. त्यामध्ये अनियमितता झाली असेल तर विभागिय कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल.--प्रदिप दळवी. कार्यकारी अभियंता. सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...