Thursday, 17 December 2020

मुरबाड मध्ये ..एच. आय. व्ही. एड्स जनजागृती अभियान.संपन्न !!

मुरबाड मध्ये ..एच. आय. व्ही. एड्स जनजागृती अभियान.संपन्न !!


मुरबाड (मंगल डोंगरे) :
        डिसेंबर 2020 मध्ये  मुरबाड तालुक्यात नेहरू युवा केंद्र ठाणे, (युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार), जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री सार्वजनिक मोठा गणपती ती गणेश उत्सव मंडळ ताड आळी मुरबाड यांच्या सहाय्याने एच. आय. व्ही. एड्स जनजागृती अभियान मुरबाड तालुक्यातील ताड आळी येथे सुरू करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर त्यांच्याद्वारे एच.आय.व्ही एड्स बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. 


त्यानंतर आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात झाली. मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये टेंपरेचर, ब्लड प्रेशर, शुगर, एच. आय. व्ही, हिमोग्लोबिन काउंट, सीबीसी अशा अनेक प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. आज समाजात एड्सबद्दल भयंकर शंका असल्यामुळे कोणीही तपासणी करून घेण्यासाठी पुढे येत नाही. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व वार्ड क्रमांक सात व आठ च्या माजी नगरसेविका मा. सौ शितलताई तोंडलीकर व मा. सौ उर्मिलाताई ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रकारच्या कार्यक्रमामुळे आपल्या भारत देशातून आपण एच. आय. व्ही.निर्मूलन करण्याचे काम निश्चितच पार पाडू. तरी या कार्यक्रमात सहभागी जिल्हा ग्रामीण रुग्णालय मुरबाड येथील  एच आय व्ही एड्स समुपदेशक मा. अर्चना भालेराव यांनी एड्स चा प्रचार प्रसार कशा द्वारे होतो त्याला थांबवायचे उपाय झाल्यास घ्यावयाची काळजी या सर्वावर खूप छान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. शितलताई तोंडलीकर (माजी. नगरसेविका वार्ड क्र. ७ मुरबाड), मा. उर्मिलाताई ठाकरे ( माजी नगरसेविका वार्ड क्र.८, मुरबाड), सुजितदादा ठाकरे, आम्रपाली आहिरे ( मुरबाड ग्रामीण रुग्णालय- लॅब टेक्निशियन), अर्चना भालेराव ( मुरबाड ग्रामीण रुग्णालय- एच आय व्ही एड्स समुपदेशक), स्वप्नाली बांगर ( स्टाफ नर्स), श्री सार्वजनिक मोठा गणपती गणेशोत्सव मंडळाचे सर्व अध्यक्ष व सदस्य, हर्षदा जाधव ( राष्ट्रीय युवा स्वयंसेवक- नेहरू युवा केंद्र ,ठाणे) श्री दत्तात्रय शांताराम पाटील (राष्ट्रीय युवा स्वयंसेवक) या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती. श्री सार्वजनिक मोठा गणपती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले. या कार्यक्रमात ७० लोकांनी सहभाग घेतला होता. त्यातील 40 पेक्षा जास्त लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. मग कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...