Monday, 21 December 2020

सिद्धगडावरील हुतात्मा दिनाचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द : कोरोना मुळे कमी उपस्थितीत दिली जाणार मानवंदना !

सिद्धगडावरील हुतात्मा दिनाचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द : कोरोना मुळे कमी उपस्थितीत दिली जाणार मानवंदना !


मुरबाड दि 21 (मंगल डोंगरे) :
       दरवर्षी 1 व 2 जानेवारी रोजी मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचा बलिदान दिन साजरा करण्यात येतो इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या वीर हुतात्म्या मानवंदना दिली जाते व इतिहासाला उजाळा दिला जातो व यासाठी मोठ्या संख्येने स्वातंत्र्य सैनिकांचे नातलग, ठाणे व रायगड, येथील शाळांचे मुख्यध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, महिलावर्ग, मशाल ज्योती आणणारी मंडळी, कुस्ती स्पर्धक पैलवान व देशप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित असतात मात्र यावर्षी देशात सुरू असलेल्या कोरोना चा प्रादुर्भाव पहाता फक्त 10 जणांच्या उपस्थितीत वीर हुतात्म्याना मानवंदना देण्याचे सिद्धगड स्मारक समिती ठरविले असून कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नसल्याने या देशप्रेमी नी उपस्थित न रहाण्याचे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष व माजी आमदार गोटीराम पवार यांनी केले आहे. 

     कोरोना चा प्रादुर्भाव पहाता हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत असून दरवर्षी हजारो च्या संख्येने या ठिकाणी येणाऱ्या देशप्रेमी, नागरिकाना घरीच रहा काळजी घ्या असे आवाहन सिद्धगड स्मारक समिती च्या वतीने करण्यात आले आहे .

No comments:

Post a Comment

कलारंग प्रॉडक्शन्स प्रस्तुत व कोकणी निखिल निर्मित आणि जनहित आधार हेल्प फंड आयोजित दोन अंकी कॉमेडी नाटक "गाव गोंधळ..." शनिवारी दादरला !!

कलारंग प्रॉडक्शन्स प्रस्तुत व कोकणी निखिल निर्मित आणि जनहित आधार हेल्प फंड आयोजित दोन अंकी कॉमेडी नाटक "गाव गोंधळ..." शनिवारी दादर...