मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायती व नगरपंचायत निवडणूकी साठी राजकीय पक्ष सज्ज : **महाविकास आघाडी विरुद्ध भाजप : मनसेही नशीब अजमावणार**
मुरबाड {मंगल डोंगरे} :
मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज झाले असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक रंगणार असताना मनसे ही पहिल्यांदाच मुरबाड नगरपंचायत व तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत आपलं नशीब अजमावणार आहे.
सरपंच पदाच आरक्षण ग्रामपंचायत निवडणूक निकला नंतर जाहीर होणार असल्याने सर्वच राजकिय पक्षांची गोची झाली आहे तर मुरबाड नगरपंचायत च्या प्रभाग रचनेवर घेतलेल्या हरकती चा निकाल प्रलंबित असल्याने नगरपंचायत निवडणूक कधी लागणार हा प्रश्न प्रलंबित आहे ? मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची रणनीती आखण्यात येत असताना तालुक्यातील भाजप आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तयारीला लागले असताना तालुक्यातील मनसे ने ग्रामपंचायत निवडणूकीत आपलं नशीब अजमावणार असल्याची तयारी सुरू केली आहे ग्रामपंचायत निवडणूकी नंतर सरपंच पदाच आरक्षण जाहीर होणार असल्याने नेमके कुणाचं वर्चस्व दिसून येणार याची चर्चा सध्या मुरबाड तालुक्यात सुरू आहे .

No comments:
Post a Comment