सायले गाव समस्यांच्या विळख्यात * हंडाभर पाण्यासाठी महिलांच्या डोळ्यात आश्रु *!
मुरबाड : {मंगल डोंगरे} - तालुक्यातील सुसंस्कृत,उच्च शिक्षित आणि राजकीय वारसा म्हणुन ओळख असणारे सायले गाव हे आदिवासी सरपंच असल्याने सध्या पिण्याचे पाणी, आरोग्य रस्ते या मुलभुत समस्यांचे विळख्यात सापडले असल्याने लाखो रुपये खर्च होऊन या समस्यांचे निवारण होत नसल्यामुळे ग्रामपंचायतचा कारभार संशयाचे भोवऱ्यात सापडला आहे.
मुरबाड माळशेज या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सायले गावात सर्व जाती समाजाची लोकवस्ती असल्याने या गावचे सरपंच पदांची जबाबदारी एका आदिवासीवर असुन तेथे कार्यरत असणाऱ्या महिला ग्रामसेविका या गावात भेडसावणारी पाणी टंचाई दुर करतील तसेच इतर सुविधा देखील ग्रामस्थांना पुरवितील अशी महिला वर्गाला अपेक्षा होती. मात्र त्या अपेक्षांचा भंग झाला आहे.
शासनाने गावातील पिण्याचे पाण्याची समस्या दुर करण्यासाठी व महिलांचे डोक्यावरील हंडा कमरेवर आणण्यासाठी गावात सुमारे साठ लाखांची पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली परंतु त्या योजनेचे पाईप कुठे गेले आणि पाणी कुठे मुरले यांचा अजुन शोध लागला नसताना व घोटभर पाणी नागरिकांच्या कोरड्या घशा पर्यंत आले नसताना ती योजना पुर्ण झाली आणि योजनेचा सर्व निधी ग्रामसेवक यांचे संगनमताने काढण्यात आला असल्याने सुमारे एक हजार लोकसंख्या असणाऱ्या गावचे महिलांना एका हातपंपावर आपली तहान भागवावी लागत असल्याने अनेक महिलांना कंबर दुखीचा त्रास होत आहे. गावातील गल्लीबोळात जाणारे सांडपाणी याची ग्रामपंचायत कडुन विल्हेवाट होत नसल्यामुळे तसेच गावात रस्ते गटारे यांची सुविधा नसल्यामुळे या सुशिक्षित सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित गावात बारमाही गटारे वाहताना दिसत आहेत. दगडगोट्यांच्या या रस्त्यावर छोटीमोठी वाहने जेव्हा चालतात तेव्हा किरकोळ अपघात होण्याच्या घटना देखील घडतात शिवाय गावात वाहणाऱ्या या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे नागरिकांना किरकोळ आजारांना सामोरे जावे लागते. या डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायत ने भाजीपाल्याला फवारणी केल्यास जाणाऱ्या किटक नाशकाची किरकोळ फवारणी केली परंतु त्याचा फायदा झालेला दिसत नाही शिवाय मागासवर्गीय निधीचा देखील ग्रामपंचायत कडुन विनीयोग होत नसल्यामुळे आदिवासी शहरातल्या देखील समस्यांचे विळख्यात सापडलेल्या दिसत आहेत.
**ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सभेत ठराव घेतला जातो.परंतु त्याचा पाठपुरावा होतो की नाही याबाबत ग्रामसेविका यांना विचारले असता त्या टाळाटाळ करतात. शिवाय नियमितपणे कार्यालयात उपस्थित रहात नसल्यामुळे फोन करण्याचा प्रयत्न केला तर फोन नेहमीच बंद ठेवण्यात येतो.-- 'गुरुनाथ शेलार. सरपंच ग्रामपंचायत सायले'.



No comments:
Post a Comment