मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर आमदार भाई जगताप यांची निवड !
मुंबई - लोकसभा, विधानसभेनंतर संजय निरुपम यांना पायउतार व्हावे लागल्याने रिक्त असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर आमदार भाई जगताप यांची निवड झाली आहे.
काँगेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काढलेल्या पत्रकात जगताप हे मुंबईचे अध्यक्ष, तर चरणसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून अमरजितसिंग आर मनहास यांना नियुक्त करण्यात आले आहे.
अजेंडा आणि प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment